बकरी ईदसाठी गोवंश हत्याबंदीला स्थगिती नाही
By admin | Published: September 22, 2015 02:26 AM2015-09-22T02:26:37+5:302015-09-22T04:02:40+5:30
ईद उल-अज्हा (बकरी ईद) निमित्त राज्यात तीन दिवस गोवंश हत्याबंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावत त्यास स्थगितीस नकार दिला
मुंबई : ईद उल-अज्हा (बकरी ईद) निमित्त राज्यात तीन दिवस गोवंश हत्याबंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावत त्यास स्थगितीस नकार दिला. आपण राज्य सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, मात्र याचिकाकर्ते सरकारकडे दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
आमिन इंद्रिसी यांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी न्या. अभय ओक व व्ही.सी. अचलिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्यात २ मार्च २०१५ पासून गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी अंतिम सुनावणी घेतल्याशिवाय बंदीला स्थगिती देणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी याचिका निकालात काढली.