लोकल, एक्स्प्रेस तिकीट दरात वाढीची शक्यता सध्या धूसरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:33 AM2017-09-04T04:33:18+5:302017-09-04T04:33:46+5:30
मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या लोकलच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता
मुंबई : मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या लोकलच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता, लोकलसह एक्स्प्रेसच्या भाडेवाढीची शक्यता सध्या धूसरच असल्याचे सांगण्यात आले. मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. यामुळे लोकल, एक्स्प्रेस भाडेवाढ लगेचच होणार नाही, भाडेवाढ होणार असल्यास ती २०१९ नंतर होईल, असे संकेत बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवासी भाडे ठरविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती प्रवासी भाड्यांचा आढावा घेणार आहे. त्यानंतर तयार होणा-या अहवालावर रेल्वे बोर्डातील अधिकारी व समितीत बैठका पार पडतील. अहवालावर चर्चा होऊन निर्णय होईल.