बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा असावा - काकडे

By admin | Published: May 11, 2015 01:46 AM2015-05-11T01:46:59+5:302015-05-11T01:46:59+5:30

हिंदू , मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी समाजासाठी स्वतंत्र विवाह कायदे अस्तित्वात आहेत. मात्र बौद्धांचे विवाह हिंदू कायद्यानुसार नोंद केले जातात.

There should be separate marriage law for Buddhists - Kaka | बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा असावा - काकडे

बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा असावा - काकडे

Next

पनवेल : हिंदू , मुस्लीम, ख्रिस्ती, पारशी समाजासाठी स्वतंत्र विवाह कायदे अस्तित्वात आहेत. मात्र बौद्धांचे विवाह हिंदू कायद्यानुसार नोंद केले जातात. बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करण्यासाठी प्रयत्न करणारे बुद्धिस्ट पर्सनल लॉ अ‍ॅक्शन कमिटी आॅफ इंडिया संघटनेने केलेल्या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच हा कायदा अस्तित्वात येणार आहे.
बुद्धिस्ट पर्सनल लॉ अ‍ॅक्शन कमिटी आॅफ इंडिया संघटनेचे मुख्य समन्वयक दिलीप काकडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून लवकरच हा कायदा अस्तित्वात येणार आहे.
धर्मांतरानंतर सहा दशके झाली तरी हा कायदा बनवला नसल्याबाबत त्यांनी यावेळी बोलताना खंत व्यक्त केली. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: There should be separate marriage law for Buddhists - Kaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.