...आली गुलाबी थंडी!
By admin | Published: November 8, 2016 04:17 AM2016-11-08T04:17:20+5:302016-11-08T04:17:20+5:30
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर कायम असल्याने राज्यात सर्वदूर सुखद गुलाबी थंडी अनुभवायाला मिळत आहे. नाशिकमध्ये निफाड येथे सर्वात निचांकी ९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़
पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर कायम असल्याने राज्यात सर्वदूर सुखद गुलाबी थंडी अनुभवायाला मिळत आहे. नाशिकमध्ये निफाड येथे सर्वात निचांकी ९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे़
विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेनीय घट झाली आहे. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रातील पाराही घसरला आहे. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशाने घटले आहे. विदर्भ, मराठवाड्यात सरासरी सहा अंशांपर्यंत घट झाली आहे़
राज्यातील प्रमख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२़२, नाशिक १०.२, जळगाव १२़६, कोल्हापूर १७़६, महाबळेश्वर १४, मालेगाव १२़८़, नाशिक १०़२, सांगली १६़१, सातारा १४़५, सोलापूर १५़६, मुंबई २२़५, अलिबाग १९़६, रत्नागिरी १९़१, पणजी २०़़३, डहाणु १९़८़, भिरा १८़, उस्मानाबाद ११़१, औरंगाबाद १३़४, परभणी १३़५, नांदेड १५, अकोला १३़५, अमरावती १२़६, बुलढाणा १५़४, ब्रम्हपुरी १६़७, चंद्रपूर १६़, गोंदिया १७, नागपूर १३़६, वाशिम १९़६, वर्धा १३़७, यवतमाळ १३़४़ (प्रतिनिधी)