रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना मिळाली होती...पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:04 AM2017-08-30T05:04:42+5:302017-08-30T05:05:44+5:30

नागपूरहून मुंबईच्या दिशेने दुरांतो एक्स्प्रेस येत असताना आसनगाव आणि वाशिंद दरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आसनगाव येथून सुटलेल्या लोकलच्या मोटरमनने ही सूचना स्टेशन मास्तरला दिली होती

There was a preliminary notice that the soil came on the railway track ... but | रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना मिळाली होती...पण

रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना मिळाली होती...पण

Next

महेश चेमटे 
मुंबई : नागपूरहून मुंबईच्या दिशेने दुरांतो एक्स्प्रेस येत असताना आसनगाव आणि वाशिंद दरम्यान रेल्वे रुळावर माती आल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. आसनगाव येथून सुटलेल्या लोकलच्या मोटरमनने ही सूचना स्टेशन मास्तरला दिली होती. स्टेशन मास्तरने गेटमनला खांब क्रॅमांक ८३-१० जवळील रुळावरील मातीचे प्रमाण पाहण्याच्या सूचना केल्या. त्याचवेळी गेटमनने संबंधीत सुपरवायझरला माती आल्याची माहिती दिली होती. आज माती काढण्याचे काम करू, असे उत्तर पीडब्लुआयच्या सुपरवायझरने गेटमनला दिले होते. सुमारे दहा ते पंधरा मिनिटांत या घटना घडल्या. याच दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे डब्बे रुळावरून घसरल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.
आसनगाव स्थानकाच्या पुढे एका वळणाजवळ मुसळधार पावसामुळे माती रेल्वे रुळावर आली होती. सुमारे ८० किमी प्रतितास या वेगाने ही एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने येत होती. वळण पूर्ण केल्यानंतर रेल्वे रुळावर मोठ्याप्रमाणात मातीचा ढीग पाहून एक्स्प्रेसच्या मोटरमनने प्रसंगावधान दाखवत आपलात्कालीन ब्रेक कार्यान्वित केले. या ब्रेकमुळे एक्स्प्रेसच्या इंजिन रुळाबाहेर फेकले गेले. मुसळधार पाऊस आणि शेजारील डोंगरावरील भुसभुशीत झालेली माती यामुळे एक्स्प्रेसचे डबे मातीत रुतून रुळावर आडवे झाले.

ही दुर्घटना भयानक असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघाताची चौकशी व जखमींना मदत मिळावी अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करू.
- कपिल पाटील,
स्थानिक खासदार

गाडी भरधाव वेगात असताना अचानक रेल्वे ट्रॅकवर माती व दगडांचा ढिगारा आला. ब्रेक दाबून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला; तोवर इंजिनसह ४ डबे उलटले.
- उमेश गरूड,
प्रत्यक्षदर्शी प्रवासी

सहा-साडेसहाच्या आसपास अचानक झटका लागला. आम्ही सगळेजण झोपेत होतो. गाडी थांबली आणि सह प्रवाशांनी बाहेर डोकावले असता अपघात झाल्याचे समजले. आम्ही सगळे अपघातातून सुखरूप बचावलो हेच नशीब. - तृप्ती सोनक, प्रवासी

Web Title: There was a preliminary notice that the soil came on the railway track ... but

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.