चुकीच्या कामांसाठी दबाव होता

By admin | Published: September 30, 2014 02:50 AM2014-09-30T02:50:52+5:302014-09-30T02:50:52+5:30

चुकीच्या कामांसाठी आपल्यावर अनेकदा दबाव आणला होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

There was pressure to do wrong things | चुकीच्या कामांसाठी दबाव होता

चुकीच्या कामांसाठी दबाव होता

Next
>पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्ला : अजित पवारांवर केला थेट आरोप 
यदु जोशी - मुंबई
मुख्यमंत्री म्हणून मी एकतरी नियमबाह्य काम केल्याचे दाखवून द्या, असे आव्हान देत अजित पवार यांनी आपल्यावर चुकीच्या कामांसाठी आपल्यावर अनेकदा दबाव आणला होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
अजित पवार यांनी एकदा नाही तर अनेकदा आपल्यावर दबाव आणण्याचे सगळे प्रय} केले. पिंपरी चिंचवडमधील हजारो नियमबाह्य बांधकामे तोडून टाका, असे उच्च न्यायालयाचे आदेश होते. त्यांना अभय मिळावे म्हणून कायदा बदलण्याचा आग्रह त्यांनी धरला. पण त्यामुळे राज्यातील सगळ्याच नियमबाह्य बांधकामांना संरक्षण मिळाले असते म्हणून मी कायदा बदलला नाही, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला. 
मुंबईत कोस्टल रोडची कल्पना मी मांडली. राष्ट्रवादीने मात्र सी लिंकच्या विस्ताराचा आग्रह धरला. कोस्टल रोडपेक्षा सी (पान 4 वर)
 
दूध का दूध होऊनच जाऊ द्या
चार वर्षात मी 4क् हजार फायली हातावेगळ्या केल्या. प्रत्येक फाईलची आरटीआयमार्फत चौकशी करा. दूध का दूध होऊन जाऊ द्या. - पृथ्वीराज चव्हाण

Web Title: There was pressure to do wrong things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.