गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी 11 देशांतील 80 व्हीव्हीआयपी येणार

By Admin | Published: August 22, 2016 07:09 PM2016-08-22T19:09:22+5:302016-08-22T19:26:37+5:30

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये 15 व 16 रोजी ब्रिक्स परिषद होणार असल्याने तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूचे सगळे होडींग्ज आणि बॅनर्स काढून टाकावेत, असा आदेश सरकारने दिला आहे.

There will be 80 VVIPs in 11 countries for BRICS conference in Goa | गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी 11 देशांतील 80 व्हीव्हीआयपी येणार

गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी 11 देशांतील 80 व्हीव्हीआयपी येणार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २२ : राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये 15 व 16 रोजी ब्रिक्स परिषद होणार असल्याने तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूचे सगळे होडींग्ज आणि बॅनर्स काढून टाकावेत, असा आदेश सरकारने दिला आहे. सुरक्षेनिमित्त ही काळजी घेतली जाणार असून ब्रिक्स परिषदेच्यावेळी कुत्रे व गुरे देखील महामार्गावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.

संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर यांच्या सहभागाने सोमवारी पर्वरी येथे उच्चस्तरीय बैठक झाली. ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच काही सूचनाही विविध सरकारी खात्यांना करण्यात आल्या.

एकूण अकरा देशांतील सुमारे आठशे अतिमहनीय व्यक्ती ब्रिक्स परिषदेनिमित्त गोव्यात येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने संरक्षण मंत्रलय, गृह मंत्रलय, नौदल, तट रक्षक दल, महाराष्ट्र पोलिस यांचीही मदत घेतली जाणार आहे. सोमवारच्या बैठकीस केंद्रीय परराष्ट्र सचिव, केंद्रीय गृह मंत्रलयाचे सचिव तसेच महाराष्ट्राचे अधिकारीही उपस्थित होते. संरक्षण मंत्रलयाकडून गोवा सरकारला ब्रिक्स परिषदेवेळी कोणती मदत व सहकार्य हवे आहे हे र्पीकर यांनी बैठकीवेळी जाणून घेतले.
ब्रिक्स परिषद दक्षिण गोव्यात होणार असून तेथील काही पंचतारांकित हॉटेल्स व दक्षिण आणि उत्तर गोव्यातील चार मोठी इस्पितळे सज्ज ठेवावी असे ठरले आहे.

हॉटेल्स आरक्षितही करण्यात आली आहेत. चीन, दक्षिण आफ्रिका, रशिया, ब्राङिाल आदी देशांतील अतिमहनीय व्यक्तींचे स्वागत करण्याची जबाबदारी गोव्यावर आहे. एकूण परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी गोव्यावर असून गोव्याला या परिषदेचा मोठा लाभ होईल. पर्यटन क्षेत्रत जगभर गोव्याचे नाव होण्यास ब्रिक्स परिषद उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री पार्सेकर यांनी बैठकीनंतर लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

तीन दिवस उडती रुग्णवाहिका
ब्रिक्स परिषदेवेळी तीन दिवस उडती रुग्णवाहिका गोव्यात ठेवली जाणार आहे. अशा प्रकारची रुग्णवाहिका केवळ संरक्षण मंत्रलयाकडे आहे पण ती उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे विदेशातून उडती विशेष रुग्णवाहिका आणण्याचा विचार आहे. ती खास रुग्णवाहिका आता आरक्षित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ब्रिक्स परिषदेनिमित्त 14 रोजी पंतप्रधान मोदी गोव्यात दाखल होणार आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्षही ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. महाराष्ट्रातील पोलिस अधिका:यांची दोन पथके परिषदेवेळी गोव्यात नियुक्त केली जातील.
 

Web Title: There will be 80 VVIPs in 11 countries for BRICS conference in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.