नवीन 34 गावांसाठी निधी द्यावाच लागेल

By admin | Published: June 30, 2014 11:42 PM2014-06-30T23:42:57+5:302014-06-30T23:42:57+5:30

महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

There will be funding for new 34 villages | नवीन 34 गावांसाठी निधी द्यावाच लागेल

नवीन 34 गावांसाठी निधी द्यावाच लागेल

Next
>पुणो : महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या गावांना मूलभूत सुविधा पुरविणो गरजेचे असल्याने त्यांच्या विकासासाठी राज्यशासनाला महापालिकेने मागणी केलेला निधी द्यावाच लागेल, असे  खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 
बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पुणो शहरात येणा:या खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत सुळे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विकास देशमुख यांची भेट घेतली. केंद्र शासनाकडे प्रलंबित कामांची यादी घेऊन लोकसभेच्या येणा:या अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. 
नव्याने 34 गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गावांनी या निर्णयास नकार दिला असला, तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यशासन घेईल. मात्र, एकीकडे एलबीटी रद्द करत असताना, पालिकेस या गावांच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार असल्याने राज्यशासनास हा निधी 
द्यावाच लागेल, असे सुळे यांनी स्पष्ट केले. 
सुळे यांनी पीएमपीसाठी नव्याने 
घेण्यात येणा:या 5क्क् बस, मेट्रो, पर्वती जलकेंद्रासाठी केंद्रशासनाने नाकारलेला निधी, तसेच जेएनएनयूआरएम प्रकल्प, पाणीपुरवठय़ाची स्थिती याबाबतची 
माहिती घेतली.   (प्रतिनिधी)
 
कारकस प्रकल्पासाठी 
जागा निश्चित 
4कचरा समस्येचा आढावाही सुळे यांनी घेतला. मृत प्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने मुंढवा येथे उभारलेल्या प्रकल्पास शासनाने मान्यता देण्यास नकार दिल्यानंतर हा प्रकल्प इतरत्र हालविण्यासाठी पालिकेने जागा निश्चित केली असल्याचे सुळे यांनी सांगितले.
4 शहराच्या चार दिशांना चार प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यातील तीन प्रकल्पांसाठी जागा अंतिम झाली असून, दीड वर्षात हे प्रकल्प सुरू होतील, असेही त्या म्हणाल्या.

Web Title: There will be funding for new 34 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.