विधानसभा निवडणुक; भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतचे संकेत आज मिळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 02:37 PM2019-09-01T14:37:30+5:302019-09-01T14:41:21+5:30

महाजनादेश यात्रेचा आज सोलापुरात समारोप; पार्क स्टेडियमवर अमित शहा यांची होणार सभा

There will be hints on the BJP-Shiv Sena's allocation formula today! | विधानसभा निवडणुक; भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतचे संकेत आज मिळणार !

विधानसभा निवडणुक; भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबतचे संकेत आज मिळणार !

Next
ठळक मुद्दे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सोलापूर दौºयावर- अमित शहाच्या दौºयामुळे सोलापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त- इंदिरा गांधी मैदानावर होणार सायंकाळी सातच्या सुमारास जाहीर सभा

सोलापूर  : भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज रविवारी सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. जुना पुणे नाका ते पार्क चौक या मार्गावर अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. यानंतर पार्क स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. या सभेतून विधानसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत संकेत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 

राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा आयोजित केली होती. २३ जिल्ह्यांचा प्रवास संपवून ही यात्रा रविवारी सोलापुरात पोहोचत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला महाजनादेश यात्रेचा रथ जुना तुळजापूर नाका येथे दाखल होईल. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी स्वागत करतील. सायंकाळी ६.३० वाजता हा रथ जुना पुणे नाका येथे दाखल होईल. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पोहोचतील. अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो शिवाजी चौकमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दाखल होईल. सायंकाळी सात वाजता पार्क स्टेडियमवर अमित शहा यांची जाहीर सभा होईल.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग वाढले आहे. दोन्ही पक्षात इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? याबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहे. रविवारी होणाºया जाहीर सभेतून युतीच्या जागा वाटपाबाबत संकेत मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपसोबत शिवसेनेच्या नेत्यांचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे. 

Web Title: There will be hints on the BJP-Shiv Sena's allocation formula today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.