कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात होणार बरेच बदल : सुहास मर्चंट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:33 PM2020-05-04T18:33:06+5:302020-05-04T18:41:01+5:30

कोरोना विषाणूच्या विरोधात होत असलेल्या लढाईत ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय काही अटींवर सुरू करण्यास संमती

There will be a lot of changes in the construction business after Corona: Suhas Merchant | कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात होणार बरेच बदल : सुहास मर्चंट 

कोरोनानंतर बांधकाम व्यवसायात होणार बरेच बदल : सुहास मर्चंट 

googlenewsNext
ठळक मुद्दे भविष्यात बांधकाम क्षेत्राला अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागणार बांधकाम व्यावसायिक बदलासाठी तयारबांधकाम व्यवसायिक, मजूर व क्षेत्राशी निगडीत अनेकांसाठी संकटाचा काळ असणार

पुणे: कोरोना विषाणूच्या विरोधात होत असलेल्या लढाईत ठप्प झालेला बांधकाम व्यवसाय काही अटींवर सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच संमती दिली आहे. मात्र त्यासाठीच्या अटी,शर्थींमधून बांधकाम क्षेत्रात बरेच बदल होतील, त्या बदलांचा अभ्यास करून आम्ही त्यासाठी तयार झालो आहोत असे बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी सांगितले.
बांधकाम मजुरांची बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणीच राहण्या जेवणाची व्यवस्था, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, त्यांच्यात काम सुरू असताना ठेवायचे शारीरिक अंतर अशा अनेक अटी सरकारने घातल्या आहेत. त्यांचे पालन करणारांनाच बांधकामांच्या त्यांच्या साइटस सुरू करता येणार आहेत.
याविषयी लोकमत बरोबर बोलताना क्रेडाईच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले,  भविष्यात बांधकाम क्षेत्राला अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागणार आहे. या काळात बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, त्यांची सुरक्षितता, त्यांना उपलब्ध सोयी सुविधा यांसारख्या बाबींवर तातडीने काम करण्याची गरज होती. ती ओळखून आम्ही मध्यंतरी आमच्या ४५० सदस्यांचे एक वेब सेमिनार घेतले. त्यात या सर्व गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे आम्ही आता या बदलांना तयार आहोत. 


क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, सचिव आदित्य जावडेकर, बांधकाम कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आय. पी. इनामदार, तसेच पराग पाटील, अर्चना बडेरा, सपना राठी, यश भंडारी, समीर पारखी यांबरोबर अनेक सभासद या वेबिनारमध्ये होते.
मर्चंट म्हणाले, बांधकाम मजूर हा बांधकाम व्यवसायाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. त्यांची सुरक्षितता, त्यांना कुशल बनविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबरोबरच मजूरांसाठी खास डिझाईन केलेले लेबर क्वाटर्स, बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला व पुरुष कामगारांच्या अंघोळी व शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणची साफसफाई, महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांसाठी बांधकाम ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था आदी गोष्टींचा विचार केला जाणार आहे. बांधकाम मजूरांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी लेबर रिलेशन ऑफिसर नियुक्त करण्याबाबतही विचार झाला पाहिजे. यातून बाहेरगावांहून, बाहेर राज्यांहून येणाऱ्या मजुरांमध्ये कामाविषयी आत्मीयता निर्माण होईल.
सरकारच्या अटी, शर्तींमध्ये काही अडचणीही आहेत. त्याविषयी संघटनेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले आहे अशी माहिती मर्चंट यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या सुपरवायझरना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्याची अडचण होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांना ओळखपत्र तसेच कंपनीचे एक पत्र देऊ. त्याला मान्यता मिळायला हवी. मजूरांचे त्यांच्या कुशलतेनूसार गट असतात. खोदाई करणार्यांचा गवंडी कामात ऊपयोग नसतो. अशा वेळी जिथे खोदाईची गरज आहे तिथे त्यांना नेण्याची परवानगी मिळायला हवी.
लॉकडाऊन उठल्यानंतर रेड झोन मध्ये नसणाऱ्या बांधकाम क्षेत्रांना सरसकट सूट द्यावी अशी विनंती क्रेडाईने सरकारला केली असल्याची माहिती मर्चंट यांनी दिली.                      
रणजीत नाइकनवरे म्हणाले, क्रेडाई बांधकाम कामगारांच्या मदतीस तत्पर आहे. त्यांना राज्य सरकारकडूनही मदत व्हावी. ती व्यवस्थित मिळावी यासाठी  प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने आपल्या कामगारांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.
कोविड १९ नंतर या आधीचे बांधकाम क्षेत्र आणि नंतरचे बांधकाम क्षेत्र अशा पद्धतीने दोन भाग पडणार असून हा काळ बांधकाम व्यवसायिक, मजूर व क्षेत्राशी निगडीत अनेकांसाठी संकटाचा काळ असणार आहे. मात्र या मधून सर्वच जण फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील असा विश्वास जे. पी. श्रॉफ, आय. पी. इनामदार यांनी व्यक्त केला. -

Web Title: There will be a lot of changes in the construction business after Corona: Suhas Merchant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.