तत्काळ तिकिटासाठी कोणतेही ओळखपत्र चालणार
By admin | Published: September 1, 2015 01:27 AM2015-09-01T01:27:06+5:302015-09-01T01:27:06+5:30
‘तत्काळ’ तिकिट काढण्यासाठी आता कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्या, १ सप्टेंबरपासून होणार आहे. तसा निर्णयच रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे
मुंबई: ‘तत्काळ’ तिकिट काढण्यासाठी आता कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्या, १ सप्टेंबरपासून होणार आहे. तसा निर्णयच रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. निर्णयामुळे ऐनवेळी तिकिट काढणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी रेल्वेचे तिकिट काढताना जे ओळखपत्र दिले जात असे, तेच प्रवासात वैध मानले जात होते. ते ओळखपत्र नसल्यास प्रवाशांवर कारवाई केली जात
होती.
तत्काळ तिकिट प्रणालीमध्ये दलालांचा हस्तक्षेप होऊ नये, म्हणून रेल्वे मंत्रालयाने तिकिट विशिष्ट ओळखपत्रांचे बंधन ठेवले होते. परिणामी तिकिट खिडक्यांवर दाखविण्यात आलेले ओळखपत्र प्रत्यक्ष प्रवासात सोबत नेणे आवश्यक होते. त्यानुसार ओळखपत्र नसल्यास अवैध तिकिट म्हणून प्रवाशांवर कारवाई केली जात होती. ही बाब लक्षात येताच रेल्वेने यात बदल केले आणि तिकिट काढताना कोणतेही ओळखपत्र चालेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)