राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 04:27 PM2023-12-06T16:27:56+5:302023-12-06T16:28:57+5:30

राठोड हे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आता राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. - भुजबळ

There will be no Marathas left in the state, all Kunbis; Bhujbal's statement outside the Legislative Assembly | राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

राज्यात मराठा शिल्लक राहणार नाही, सगळे कुणबी; विधानसभेबाहेर भुजबळांचे वक्तव्य

मराठा आरक्षणावर आता काही चर्चा करून फायदा नाही. ते ओबीसीत येत आहेत. राज्यात एकही मराठा शिल्लक राहणार नाहीय. आता काही चर्चा करून फायदा नाही, असे भुजबळांनी सांगितले. 

राठोड हे ओबीसींमध्ये फुट पाडण्याचा गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहेत. आता राज्यात सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळत आहेत. कुठे दादागिरी करून कुठे काय करून ते मिळविले जात आहेत. यापुढेही ते मिळत राहतील. यामुळे राज्याच एकही मराठा शिल्लक राहणार नाही, असे भुजबळ म्हणाले. विधानसभेबाहेर भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. 

समितीचे न्यायमूर्ती शिंदे गावागावात जाऊन तुम्ही हे करा, असे पुरावे द्या असे सांगत आहेत. यामुळे सर्व मराठे ओबीसीमध्ये येणार आहेत. ओबीसी आयोगच राहिलेला नाहीय. तो मराठा आयोग झाला आहे, अशी टीकाही भुजबळ यांनी केली. 

५ राज्यांच्या निकालानंतर EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. तुम्हाला काय योग्य वाटतं?

ईव्हीएम (1200 votes)
बॅलेट पेपर (1184 votes)

Total Votes: 2384

VOTEBack to voteView Results

Web Title: There will be no Marathas left in the state, all Kunbis; Bhujbal's statement outside the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.