माफीची साक्षीदार होणार

By admin | Published: February 5, 2017 12:31 AM2017-02-05T00:31:45+5:302017-02-05T00:31:45+5:30

‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप

There will be witnesses of forgiveness | माफीची साक्षीदार होणार

माफीची साक्षीदार होणार

Next

सातारा : ‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप होतोय म्हणून मी खरीखुरी हकीकत न्यायालायात सांगायला तयार आहे,’ असे सांगून ज्योती मांढरे हिने आपण माफीचा साक्षीदार होण्याची कबुली न्यायालयात दिली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी प्रथमच जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून सरकार पक्षाची बाजू मांडली.
वाई येथील संतोष पोळ याने २००३ ते २०१६ या १३ वर्षांच्या कालावधीत सहा खून करून मृतदेह पुरल्याचा छडा सातारा पोलिसांनी लावला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. सहापैकी तीन खुनांमध्ये ज्योतीचा समावेश असल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले. हा सर्व खटला परिस्थितीजन्य असल्याने ज्योती मांढरे हिला न्यायालयाने माफीचा साक्षीदार करावे. पोळ हा मुख्य आरोपी असल्याने या दोघांची भेट
झाली तर तो ज्योतीवर दबाव आणण्याची शक्यता लक्षात घेता या दोघांना कारागृह प्रशासनाने
भेटू दिले जाऊ नये, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. (प्रतिनिधी)

या हत्याकांडात संतोष पोळ हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराविषयी हरकत घ्यायचा त्याला कायदेशीर अधिकार नाही. ज्योती मांढरेला जर माफी दिली आणि तिने सर्व हकीकत न्यायालयात सांगितली तर तिची माफी कायम राहील. न्यायालयाने माफी दिली तर या दोघांना परस्परांशी बोलण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
- अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

Web Title: There will be witnesses of forgiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.