या आहेत तुकोबा पालखी सोहळ्यातील मानाच्या बैलजोड्या
By Admin | Published: May 30, 2017 01:41 PM2017-05-30T13:41:31+5:302017-05-30T13:47:08+5:30
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पालखीच्या रथाला भानुदास भगवान खांदवे आणि आप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या बैलजोडींना संस्थानच्या वतीने पालखी रथ ओढण्यासाठी संधी मिळाली आहे.
ऑनलाइन लोकमत
देहूगाव, दि. 30 - श्री संत तुकाराम महाराजांच्या 332व्या पालखी सोहळ्यासाठी पालखीच्या रथाला लोहगाव येथील भानुदास भगवान खांदवे यांच्या सर्जा राजा, आणि चिंबळी(ता. खेड) येथील आप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक व राजा या बैलजोडींना संस्थानच्या वतीने पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देण्यात आली आहे. ही घोषणा आज संस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख अभिजित महाराज मोरे यांनी केली. यावेळी सुनिल महाराज मोरे, संस्थानचेअध्यक्ष पंढरीनाथ मोरे, सुनिल दामोदर मोरे, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.
या परिक्षणामध्ये बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, त्यांची चाल व काम करण्याची क्षमता यांची पाहणी करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. या निकषांनुसार पारदर्शीपणे सर्व बैल जोडींचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती अभिजित मोरे यांनी दिली.
सुनिल मोरे म्हणाले की, पालखी सोहळ्यात पालखीच्या रथाचे मानकरी असलेल्या बैलांची, मानाच्या अश्वांची व नगारखान्याच्या बैलांची देखील चौख व्यवस्था ठेवली जाते. या सर्वांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, व आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाते. बैलांना पोषक चारा दिला जातो. या सर्वांची दररोज वैद्यकीय तज्ज्ञाद्वारे तपासणी केली जाते व नंतरच हे बैल पालखी रथाला किंवा नगारखान्याला जुंपले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आप्पासाहेब महादू लोखंडे यांच्या माणिक व राजा