या पाच प्रकारच्या पुरुषांना टाळणे महिलांच्या हिताचे
By admin | Published: February 2, 2017 12:45 PM2017-02-02T12:45:11+5:302017-02-02T12:45:11+5:30
काही पुरुषांचा स्वभाव तसेच नैसर्गिक गुण असे असतात की, महिला त्यांच्याकडे आपणहून आकर्षित होतात पण काही पुरुष...
Next
ऑनलाइन लोकमत
काही पुरुषांचा स्वभाव तसेच नैसर्गिक गुण असे असतात की, महिला त्यांच्याकडे आपणहून आकर्षित होतात पण काही पुरुष असे असतात की, महिलांना क्षणभरही त्यांच्या सोबत राहू नये असे वाटते. असे पाच प्रकारचे पुरुष आहेत ज्यांना टाळणे किंवा त्यांच्यापासून दूर राहणेच महिलांच्या हिताचे आहे.
चंचल स्वभाव
काही पुरुषांचा स्वभाव अत्यंत चंचल असतो. क्षणामध्ये त्यांचे मनपरिवर्तन होते. प्रियकर असेल तर पाहणा-याला प्रेयसीची किती काळजी घेतो असे वाटेल. पण काहीवेळातच त्याच्या वर्तनात बदल झालेला असतो. तुम्हालाच प्रश्न पडतो असे काय घडले की, हा असा वागतोय. अशा प्रकारच्या वागण्यामुळे नेमक याला काय झालयं ? असा प्रश्न स्त्रियांना पडतो.
फक्त स्वत:चा विचार करणारा
तुम्हाला तो डिनरसाठी छानशा हॉटेलमध्ये घेऊन जाईल. तुम्ही मेनूकार्डही चाळाल. पण शेवटी तुम्हाला तोच पदार्थ खावा लागेल जो त्याला हवा आहे. तुमच्या आवडी-निवडीला, मताला त्याच्या लेखी अजिबात किंमत नसेल. फोनवरुन बोलताना तो फक्त त्याचा दिवस कसा होता ? याच कथन करेल. त्याच लक्ष्य काय ते सांगेल. पण तुमचा दिवस कसा होता ? हा प्रश्नही विचारणार नाही. फक्त स्वत:पुरता स्वार्थी विचार करणारा. अशा पुरुषाशी नाते जोडले गेले तर तुमचे आयुष्य दु:खात जाईल.
फक्त सेक्सपुरता विचार
काही पुरुष स्त्रियांचा फक्त सेक्सपुरता विचार करतात. स्त्रीची काळजी घेणे, तिच्यावर प्रेम व्यक्त करणे यामागे फक्त सेक्सची भावना असते. ही भावना फक्त एका स्त्रीपुरता मर्यादीत नसते. संपर्कात येणा-या प्रत्येक स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच असतो. रिसेप्शनीस्ट, वेटर, महिला सहकारी प्रत्येक स्त्रीच्या भावनाच्या जवळ जाण्याचा अशा पुरुषांचा प्रयत्न असतो. काही स्त्रियांना असा स्वभाव लगेच लक्षात येतो. त्यामुळे अशा पुरुषांपासून दूर राहणेच महिलांच्या हिताचे आहे.
असुरक्षिततेची भावना
काही पुरुष असुरक्षित असतात. आयुष्य जगताना त्यांची संभ्रमावस्था असते. त्यांना सारखी हमी लागते. भावना त्यांच्या ओतप्रोत भरलेल्या असतात. स्त्रियांना पुरुषांमध्ये एका कणखरपणा लागतो. तो त्यांच्यामध्ये दिसत नाही. कुटुंब संभाळायचे कि, नव-याला संभाळायचे असा प्रश्न कधी कधी स्त्रियांना पडतो. त्यामुळे अशा पुरुषांपासून दूर राहणेच हिताचे असते.
चौकटी बंद आयुष्य
स्त्रियांना सरप्राईज आवडते. प्रियकर किंवा नव-याने कधीतरी सुखद धक्का द्यावा अशी स्त्रियांची भावना असते. पण काही पुरुषांचे जगणे ठरलेले असते. ते पुढच्या क्षणाला काय करणार हे पक्के माहित असते. अशा पुरुषांसोबत आयुष्य काढताना तोच तोच रटाळपणा येतो. नावीन्य काही राहत नाही.