हे तीन जण आदित्य ठाकरेंना वाटतात सर्वात स्टायलिश

By admin | Published: January 31, 2017 10:40 PM2017-01-31T22:40:07+5:302017-01-31T22:54:38+5:30

राजकारणाचं व्यासपीठ असो इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो प्रत्येकवेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळते.

These three people think Aditya Thakarena is the most stylish | हे तीन जण आदित्य ठाकरेंना वाटतात सर्वात स्टायलिश

हे तीन जण आदित्य ठाकरेंना वाटतात सर्वात स्टायलिश

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - युवासेनेच्या माध्यमातून तरुणाईचे संघटन करताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाचाही विचार करणारा युवा नेता आदित्य ठाकरे यांचे स्टाइलविषयींचे परफेक्शनदेखील जबरदस्त आहे. त्यामुळेच ते त्यांच्या लूकमुळे कायम चर्चेत असतात. राजकारणाचं व्यासपीठ असो इव्हेंट किंवा एखादी पार्टी असो प्रत्येक वेळी आदित्य ठाकरे यांचा लूक वेगवेगळा असल्याचे पाहायला मिळते.

राजकारण्यांसह विद्यार्थ्यांमध्येही आदित्य ठाकरेंची प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या या लोकप्रियतेमुळे त्यांना महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आदित्य ठाकरे यांना हा पुरस्कार लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा आणि ऋषी कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ऋषी कपूर यांनी विजय दर्डा यांना त्यांची आत्मकथा खुल्लम खुल्ला भेट दिली.

‘लोकमत’ महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’ लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा



लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आदित्य ठाकरे यांच्याशी सर्वांसमक्ष मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी त्यांनी कोणत्या मुलीला डेट करायला आवडेल, लाईफ पार्टनर कशी पाहिजे अशा अनेक बाउन्सर प्रश्नांची उत्तरे दिले. सोनम कपूर, अतुल कसबेकर, अजिंक्य रहाणे हे तीन जण आदित्यला सर्वात स्टायलिश वाटतात. स्वत:ला रईस मानतो की, काबील समजतोस या प्रश्नावर तो म्हणाला की, मला पडद्यामागचा कलाकार व्हायला आवडेल. ​मेजर साहब आणि टायटॅनिक पाहून आदित्य रडला होता. अशा प्रकारे दोघांमधील संवाद सोहळ्यात रंगत आणणारा ठरला. काही प्रश्नांवरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Web Title: These three people think Aditya Thakarena is the most stylish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.