इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची मनोज जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 02:26 PM2024-02-20T14:26:18+5:302024-02-20T14:27:03+5:30
आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली.
आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली. तसेच आपल्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले.
जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तिथून ते आमदारांना आई वरून शिवीगाळ करतात. आयुक्त तिथे बसलेले त्यांना शिवी घालत होते. या जरांगे यांनी २७ तारखेला गुलाल उधळला आणि तिकडे जाऊन पुन्हा १० तारखेला उपोषणाला बसले. गाड्या फोडल्या, असा आरोप भुजबळ यांनी केला.
याचबरोबर अजय महाराज बारस्कर यांचा दाखला देत भुजबळ यांनी या महाराजांनीसुद्धा हे ऐकणारे नाहीत असे म्हटले आहे. यांचे मारुतीचे शेपुट वाढतच जाणार असे म्हटल्याचे सांगितले. तसेच हे धमक्या देत आहेत. आम्ही काही बोललो की आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला.
यावर भुजबळ यांना उद्देशून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, तुमच्या सुरक्षेला धोका आहे याची नोंद मी घेतली आहे. सरकारने त्याची योग्य दखल घ्यावी, असे आदेश मी देत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हे विशेष अधिवेशन स्थगित करत असल्याची घोषणाही नार्वेकर यांनी केली.