...त्यांनी रचले स्वत:चेच सरण!

By admin | Published: December 15, 2014 03:42 AM2014-12-15T03:42:23+5:302014-12-15T03:42:23+5:30

गारपिटीसह पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने भरपाई मिळावी पीककर्ज माफ करावे, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील रूई

... they created their own arrows! | ...त्यांनी रचले स्वत:चेच सरण!

...त्यांनी रचले स्वत:चेच सरण!

Next

नाशिक : गारपिटीसह पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने भरपाई मिळावी पीककर्ज माफ करावे, या मागणीसाठी निफाड तालुक्यातील रूई परिसरातील सुमारे ५० शेतकऱ्यांनी रविवारी सकाळपासून गाव बंद ठेऊन तीन ठिकाणी सरण रचून सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गारपीट व अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. मात्र पंचनाम्यास अजून प्रशासन न फिरकल्याच्या निषेधार्थ व नुकसान भरपाई मिळावी, यासाठी रविवारी सकाळपासून सरपंच कैलास तासकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५० शेतकऱ्यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी लाकडाचे सरण तयार करत शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले. निफाडचे तहसीलदार संदीप आहेर, नायब तहसीलदार साहेबराव सोनवणे, कृषी अधिकारी कैलास ढेपे, पोलिस उपअधीक्षक संदीप आटोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी सरकारी दरबारी प्रश्न मांडून न्याय देण्याची भूमिका मांडली होती. मात्र जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: ... they created their own arrows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.