‘ते’एसएमएस शॉपिंग अॅपच्या पब्लिसिटीसाठी : मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:33 PM2019-02-05T19:33:30+5:302019-02-05T19:34:46+5:30
तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़...
पुणे : तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस गेल्या काही दिवसांपासून लोकांना येत होते़. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीचा हा नवा प्रकार असल्याच्या संशयाने त्यावरील लिंक उघडून पाहा नका, असा इशारा देण्यात आला होता़. मात्र, हे एसएमएस एका शॉपिंग मोबाईल अॅपच्या प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आल्याचे पुणे सायबर क्राईम सेलने केलेल्या तपासात आढळून आले आहे़.
तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़. त्यामुळे हा ऑनलाईन शॉपिंगचा प्रकार असावा, असे वाटून ही लिंक ओपन करु नका, असे सांगणारे एसएमएस त्याबरोबर पाठविले जाऊ लागले होते़. त्याची तक्रार पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे करण्यात आली होती़ . सायबर सेलने याची सखोल तपासणी केल्यावर हे बल्क एसएमएस उत्तर प्रदेशातील बीएसएनएलच्या पश्चिम विभागातून येत असल्याचे दिसून आले़. त्यानुसार बीएसएनएलकडून सायबर सेलने माहिती घेतल्यावर दिल्लीतील एका कंपनीने हे बल्क एसएमएस पाठविण्याची सुविधा घेतली असल्याचे आढळून आले़. सायबर सेलने या कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर शनिवारपासून आता हे एसएमएस येणे बंद झाले आहे़.
दिल्लीच्या एका कंपनीने काढलेल्या नवी मोबाईल अॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़. या कंपनीने हे काम दुसºया एका कंपनीला दिले होते़. त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटीने हे एसएमएस पाठविण्यात आले़. त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़.
या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़. यावर कोणी संपर्क साधला तर त्याने त्या अॅपवरुन पुढील काळात काही खरेदी केली तर त्याला त्याच्या बिलात ही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़. मात्र, त्याचा सर्वांनी विपरित अर्थ काढला गेल्याने फसवणूकीचा हा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़.
याबाबत सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़. ते सांगतात, तसाच त्यांचा हेतू होता का याबाबत अधिक तपास करत आहोत़. त्याचा काही गैर हेतू होता का याची पडताळणी केली जात आहे़ .