बडतर्फ कर्मचाऱ्यांना परत घेणार

By admin | Published: March 18, 2016 02:44 AM2016-03-18T02:44:52+5:302016-03-18T02:44:52+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दोन-चार दिवस गैरहजर राहिले तर बडतर्फ केले जातात. गेल्या सहा वर्षात सुमारे ४ हजार कर्मचारी अशाप्रकारे बडतर्फ झाले आहेत.

They will take back big workers | बडतर्फ कर्मचाऱ्यांना परत घेणार

बडतर्फ कर्मचाऱ्यांना परत घेणार

Next

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी दोन-चार दिवस गैरहजर राहिले तर बडतर्फ केले जातात. गेल्या सहा वर्षात सुमारे ४ हजार कर्मचारी अशाप्रकारे बडतर्फ झाले आहेत. एवढी वर्षे सेवा दिल्यानंतर होणाऱ्या बडतर्फीमुळे कर्मचाऱ्याचे कुटुंब वाऱ्यावर येते. याची दखल घेत बडतर्फ कर्मचाऱ्यांना एक संधी दिली जाईल. ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या व वैद्यकीयदृष्ट्या उत्तम असलेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेतले जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
रावते म्हणाले, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बस पोर्ट उभारले जातील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय लवकरच निविदा निघतील. १२४ कोटी रुपये खर्च करून बस स्थानकांची दुरुस्ती केली जाईल. सुरक्षेसाठी २५० बसस स्थानकावर ७६२ नवीन सुरक्षा रक्षक नेमले जातील.
७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आठ दिवसात अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल. उर्वरित पदे भरण्यासाठी महिनाभरात प्रक्रिया केली जाईल. एसटी महामंडळाची उपहारगृहे महिला बचत गटांना अल्पदरात दिली जातील. एड्सग्रस्तांनाही त्यांची ओळख समोर न येता कशी सवलत देता येईल, सिकलसेलग्रस्तांना मोफत प्रवासाची सवलत कशी देता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अपघाती मृत्यूचे हजारो दावे प्रलंबित आहेत. प्रत्येक तिकीटावर सरसकट एक रुपया सेस लावून त्या रकमेतून १० लाख रुपये मोबदला दिला जाईल. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल, असे त्यांनी सांगितले.
आॅटोरिक्षा परवाना १ लाख ४० हजार परवाने व्यपगत झाले होते. त्यातील ४३ हजार परवान्यांसाठी लॉटरी महाआॅनलाइन मार्फत काढली. त्यामध्ये एक लाख ६२ हजार अर्ज आले. ४० हजार अर्ज मराठी भाषिक होते. १ लाख २० हजार बिगर मराठी भाषिक होते. लॉटरीत ३५ टक्के मराठी आले. ७ हजार ४७७ जणांना मराठी येत नाही म्हणून परवाने प्रलंबित
ठेवले.
१९ हजार मराठी बांधवांना मिळाले. मराठी वाचता व लिहिता येणे ही कायद्यात तरतूद आहे. कागदपत्र पडताळणीसाठी मराठी भाषेची परीक्षा घेतली. अजून दोन लाख परवाने शहरांसाठी येत आहेत. त्यात ५२ टक्के आरक्षण दिले जाईल. या आरक्षणात ५ टक्के आरक्षण गिरणी कामगारांना व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील तसेच बेळगाव-कारवारच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या वारसांना दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

कर्मचाऱ्याच्या मुलीला २१ व्या वर्षी १ लाख
१ एप्रिल २०१६ पासून एसटी कर्मचाऱ्याच्या घरी जन्मलेल्या मुलीच्या नावावर १७ हजार ५०० रुपये जमा केले जातील. २१ व्या वर्षी संबंधित मुलीला एक लाख रुपये मिळतील. एसटी कर्मचाऱ्यांना अटल पेन्शन योजना अनिवार्य करण्यात आली आहे. हप्ता पगारातून कापला जाईल, असेही रावते यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये बस पोर्ट उभारले जातील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय लवकरच निविदा निघतील. ७० टक्के अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. आठ दिवसात अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल. उर्वरित पदे भरण्यासाठी महिनाभरात प्रक्रिया केली जाईल. एसटी महामंडळाची उपहारगृहे महिला बचत गटांना अल्पदरात दिली जातील. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री

Web Title: They will take back big workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.