‘त्या’ शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार
By admin | Published: January 11, 2016 02:34 AM2016-01-11T02:34:33+5:302016-01-11T02:34:33+5:30
जैन समाजाच्या प्रगतीसोबतच भारतीय जैन संघटना राष्ट्र उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त
बाहुबली (कोल्हापूर) : जैन समाजाच्या प्रगतीसोबतच भारतीय जैन संघटना राष्ट्र उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याची घोषणा भारतीय जैन संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी येथे केली.
बाहुबली-कुंभोजगिरी (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) येथे संघटनेच्या राज्य अधिवेशनामध्ये शांतीलाल मुथा बोलत होते. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व राज्याध्यक्ष पारस ओसवाल, सेक्रेटरी अभिनंदन खोत, श्रीमंत शाहू महाराज, उद्योजक संजय घोडावत यांची प्रमुख उपस्थिती होती. मुथा म्हणाले, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यावर उपाय शोधण्याचे काम सुरू आहे. राज्यातील मराठवाडा व विदर्भातील ३५0 मुलांच्या ५वी ते १२वीच्या शिक्षणाची जबाबदारी संघटनेने उचलली आहे. संजय घोडावत यांनी संघटनेच्या कार्याला आवश्यक ती सर्व मदत करण्याचे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत त्यांच्या मुलांना घोडावत इन्स्टिट्यूटकडून स्कॉलरशिप देण्याचे आश्वासन दिले. या वेळी अनिल पाटील यांनी संपादित केलेल्या संघटनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. (वार्ताहर)