'ते' ट्विट पडणार महागात! पाडकामाचा खर्च पालिका कपिलकडून करणार वसूल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2016 09:12 AM2016-09-12T09:12:45+5:302016-09-12T09:12:45+5:30

कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे 'ट्विट' कॉमेडी किंग कपिल शर्माला महागात पडण्याची चिन्हं दिसत आहेत.

'They will tweet' in the price! Kapal Kapoor's cost of reckoning? | 'ते' ट्विट पडणार महागात! पाडकामाचा खर्च पालिका कपिलकडून करणार वसूल?

'ते' ट्विट पडणार महागात! पाडकामाचा खर्च पालिका कपिलकडून करणार वसूल?

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - कार्यालयाच्या बांधकामासाठी महापालिकेने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करणारे 'ट्विट' कॉमेडी किंग कपिल शर्माला महागात पडण्याची चिन्हं दिसत आहेत. ' ज्या बांधकामासाठी लाच मागितल्याचा आरोप कपिलने केला होता, ते बांधकाम अवैध होतं व त्यासंबंधी महापालिकेने त्यावा 16 जुलै 2016 रोजी नोटीसदेखील पाठवली होती, अशी माहिती आता समोर आली असून', ते अवैध बांधकाम पाडण्यासाठीचा खर्च आता महापालिकाकडून कपिलकडूनच वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा हा ट्विटर बॉम्ब त्याच्यावरच उलटण्याची चिन्हे आहेत. 
(कपिल शर्माकडे महापालिकेने मागितली 5 लाखांची लाच ?)
(कपिल शर्माची पलटी, म्हणे फक्त काळजी व्यक्त केली)
 
'मी गेली 5 वर्ष न चुकता 15 कोटींचा आयकर भरत असतानाही माझ्या कार्यालयासाठी महापालिकेला 5 लाखांची लाच द्यावी लागते', असं ट्विट कपिल शर्माने केलं होतं,  एवढंच नव्हे तर ' हेच का तुमचे अच्छे दिन ? असा सवाल विचारत त्याने पंतप्रधान मोदी टॅग केलं होतं. या सर्व प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देत दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन दिले होते.  महापालिकेने कपिल शर्माला तक्रार नोंद करण्यासाठी सांगत ज्या व्यक्तीने लाच मागितली त्याचं नाव उघड करण्याची मागणी केली होती. मात्र काही काळानंतर कपिलच्या कार्यालयाचे बांधकामच अवैध असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पालिकेने जुलै महिन्यात कपिलला नोटीस पाठवून ते बांधकाम  तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. आपले आरोप आपल्याच अंगाशी येत असल्याचं पाहून कपिलने लगेच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 
(कपिल शर्मा काट्रॅजेडीशो)
(कपिल शर्मा जनतेच्या तक्रारीपण मुख्यमंत्र्यांकडे पोचवा ना प्लीज!)
 
 
मात्र आता त्याचे हेच अनधिकृत ऑफीस पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळत असून त्यासाठी लागणारा सर्व खर्च कपिलकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचे समजते. याप्रकरणी त्यावा गणपतीनंतर नोटीस पाठवण्यात  येणार आहे. 

Web Title: 'They will tweet' in the price! Kapal Kapoor's cost of reckoning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.