‘सायन्स टॉपर’ बनला चोर

By admin | Published: June 7, 2017 06:04 AM2017-06-07T06:04:11+5:302017-06-07T06:04:11+5:30

गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली.

Thieves became a 'science topper' | ‘सायन्स टॉपर’ बनला चोर

‘सायन्स टॉपर’ बनला चोर

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गाड्यांची चोरी करून ‘ओएलएक्स’वर विक्री केल्याप्रकरणी उच्चभ्रू कुटुंबातील जयकिशन ओमप्रकाश सिंग (२३) या विद्यार्थ्याला सोमवारी अंधेरीतून अटक करण्यात आली. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावी ‘सायन्स टॉपर’पैकी एक असून त्याला २०१५-१६ मधील बोर्डाच्या परीक्षेत ९८.५०% गुण मिळाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून एमआयडीसी पोलीस त्याच्या मागावर होते.
जयकिशन ओमप्रकाश सिंग अंधेरी पूर्वच्या मालपाडोंगरी परिसरात कुटुंबासोबत राहतो. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. तो राहत असलेल्या परिसरातच त्याने काळ्या रंगाची होंडा कंपनीची टिष्ट्वस्टर ही मोटारसायकल चोरली. ती घेऊन जात असताना गस्तीवर असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. पोलीस ठाण्यात आणल्यावर सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या जयकिशनला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे मिटविण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्हीदेखील फोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने तीन महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. गाडी चोरून ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ‘ओएलएक्स’वर शेअर करायचा आणि ती विकायची   अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
>अन् बाईक ‘ओएलएक्स’वर सापडली !
सहा महिन्यांपूर्वी जयकिशनने एमआयडीसी परिसरातून एक मोटरसायकल चोरी केली होती. तिची जाहिरात त्याने ‘ओएलएक्स’ वर दिली जी नेमकी त्याच मोटारसायकलच्या मालकाने पाहिली. त्यानुसार त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शाम आयरे यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण, सोनवणे, ब्रिजेश पवार, आतोळे आणि गवळी यांचे एक पथक तयार केले होते. ते जयकिशनच्या मागावर होते आणि अखेर सोमवारी रात्री या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
>व्यसनामुळे चोरी...
अंधेरीच्या जीपीएम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या जयकिशनला बारावीनंतर अमली पदार्थांची (बटन्स) सवय लागली. त्यामुळे गाड्या चोरण्यास त्याने सुरुवात केली. त्यातही पदवीच्या पहिल्या वर्षी तो वर्गात पहिला आला. मात्र द्वितीय वर्षात त्याला एका विषयात के.टी. लागली. तेव्हा पालक त्याला गावी घेऊन गेले आणि तेथे त्याचे लग्न लावून दिले. गावी काही महिने तो नीट वागला, मात्र मुंबईला पुन्हा के.टी.च्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आला आणि त्याने गाडी चोरण्याची योजना बनवली. मात्र या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले.

Web Title: Thieves became a 'science topper'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.