गोष्ट शिक्षिका घडण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:58 AM2017-11-23T05:58:00+5:302017-11-23T05:58:03+5:30

सत्तर पंच्याहत्तर चुलींच गाव, स्वतंत्र महसुली त्याला नाव, टेकडीवर वसलेलं ठाम , त्या पंचक्रोशीत वादी म्हणून ठावं!

The thing happened to mistress | गोष्ट शिक्षिका घडण्याची

गोष्ट शिक्षिका घडण्याची

Next

- संतोष सोनवणे
सत्तर पंच्याहत्तर चुलींच गाव, स्वतंत्र महसुली त्याला नाव, टेकडीवर वसलेलं ठाम , त्या पंचक्रोशीत वादी म्हणून ठावं!
एखाद्या कवीच्या शब्दातून नजरेस पडावे असे शिरपूर गाव म्हणजे आदिवासी संस्कृतीने नटलेला निसर्गाच्या सान्निध्यातील परिसर होय. सन २००६ मध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाल्यावरच प्राजक्ताबार्इंना येथील मुलांच्या बौध्दिक चातुर्याची चुणूक दिसून आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही या मुलांची शिकण्याची गती ही बार्इंच्या मनाला मोहित करून टाकणारी होती. इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा कौलारू इमारत. ठाकरी भाषा शेती संस्कृती, कष्टाळू जीवन, उत्तम सहकारी आणि त्या मुलांचा निरागसपणा यातून खूप काही शिकत बार्इंचा प्रवास सुरु झाला होता.
प्राजक्ता बाई या शाळेत येण्यापूर्वीच या शाळेच्या गुणवत्तेचा आलेख चढताच होता. कोणत्याही शाळेचे नाव, प्रतिष्ठा , तिचा दबदबा हा मुलांच्या गुणवत्तेतूनच दिसून येत असतो. शाळेतील मुलांमध्ये भरारी घेण्याची जिद्द निर्माण झालेलीच होती. साधारणपणे पुढे पाच वर्षांनी प्राजक्ता यांना शाळेचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली. सुरुवातीला त्यांचीही स्थिती थोडी बावरल्यासारखी झाली होती परंतु त्यांनी धीर धरला. शाळेच्या, प्रशासनाच्या तांत्रिक बाजू समजावून घेतल्या. पण एका कोपºयात त्यांना सारखे वाटे की शाळेचा आलेख घसरता कामा नये. माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हायस्कूलमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत टिकला पाहिजे. तो प्रवाहापासून दूर जाता कामा नये.
सर्वप्रथम बार्इंनी येथील स्थानिक भाषेचा आदर करीत काही मोजके व नेहमीच्या वापरातील शब्द समजावून घेतले. कारण भाषा हीच सर्वात आधी माणसा-माणसाला जवळ आणते. मुलांचा काटकपणा लक्षात घेऊन त्यांना क्र ीडास्पर्धेत उतरवून सलग तीन वर्षे तीन पायाची शर्यत, लंगडी (मुली) यांचा संघ तालुका स्तरापर्यंत विजयी होत गेला. मुलांसोबत शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढला. परिसरातील हायस्कूलमध्ये आयोजित केल्या जाणाºया आनंद महोत्सवात विद्यार्थी सहभगी होऊ लागले. रंगमंच हा अनुभव मुलांना नवीन होता. मात्र मुले सहभागी होत गेली. शिक्षकांच्या जवळ आली. पालकांनी मोठा विश्वास दाखविला आणि एकूणच शालेय शैक्षणिक वातावरणाला वेग येत गेला. बार्इंना स्वत:ला इंग्रजीचे आकर्षण त्यामुळे मुलांमध्येही ती आवड निर्माण करायला मदत झाली. मुले इंग्रजी शब्द, गाणी, गोष्टी सांगू लागले. पालकांनी त्याचे फार कौतुक वाटू लागले. सहकारी शिक्षकांची फार साथ लाभली.
निवडणूक कामाच्या एका जबाबदारीमुळे गावातील स्थानिक महिला व पालकांशी संपर्क आला. चर्चेतून हा संवाद वाढत गेला आणि मुलांचे शिकणे, त्यावर त्यांचे समज-गैरसमज, अडचणी, हायस्कूल मध्येच सोडणारी मुले असे अनेक प्रश्न यातून पुढे येत गेले. यामुळे बार्इंना मुलांच्या पालकांच्या घरापर्यंत जायला मिळाले. याचा संदर्भ बाई मुलांचा अभ्यास आणि त्यांचे शिकणे याला हळूहळू जोडू लागल्या होत्या. महिला पालक यांना मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा याच्या क्लृप्त्या देवू लागल्या. केवळ नुसता दप्तरातील पुस्तकाचा पसारा मांडून बसणे म्हणजे अभ्यास नव्हे तर, स्वयंपाक करता करता मुलांचे पाठांतर- वाचन घेणे, नातीच्या कविता ऐकणे, गोष्ट ऐकणे, पाढे म्हणवून घेणे, घरात मदत करायला लावणे, घरासमोर रांगोळी काढणे,घरचा परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी सोपविणे हे सारे त्या बार्इंच्या नव्या मैत्रिणींना पटू लागले. कारण बाईच त्यांच्या मैत्रीण झाल्या होत्या.
शाळेत येता जाता पालकांसोबतचा होणारा संवाद मुलांच्या शिकण्यात किती मोठा असतो याची जाणीव पदोपदी बार्इंना येत होती, नव्हे तर बार्इंचे काम खूप सोपे व हलके होत होते. मुलांनाही याची कल्पना होत होती की आपल्या बाई या आपल्या आई-बाबांसोबत सतत माझ्या अभ्यासाबद्दल बोलत असतात.
आपल्या बाई माझ्या आईच्या मैत्रीण आहेत ही भावना मुलांना शिकण्यात व शाळेत जबाबदारीने वागण्यात खूप महत्वाची ठरत होती. बाई केवळ मुलांच्या अभ्यासाबद्दलच बोलत नसे तर एक व्यक्ती म्हणून त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन सामाजिक भानही जपत होत्या.
शाळेत नित्य नियमाने सुरु असणाºया व समाजाला अपेक्षित असणाºया सगळे शाळेत आज दिसून येत आहे. मात्र हे सारे वळून पाहताना केवळ डी.एड. होऊन आपण परिपूर्ण शिक्षक होऊ शकतो या विचारातून व भावनेतून बार्इंना बाहेर यावे लागले.
शाळा म्हणजे पुस्तक असे म्हणणे खूपच मर्यादित ठरेल. या पुस्तकापलीकडेही जग आहे याची जाणीव व आनंद आज प्राजक्ता बार्इंच्या सांगण्यातून स्पष्टपणे दिसून
येते.
कोणताही पेशा, व्यवसाय हा आधी अंगात रु जायला लागतो. त्याप्रती निष्ठा आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते. शिक्षकी पेशाही त्याला अपवाद नाही. विशेषत: ग्रामीण भागात शिक्षकांची खरी कसब लागते. या सूत्राने अनेक शिक्षकांनी वाडी-वस्तीवर शाळा नामक नंदनवन फुलविले आहे. जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथील शिक्षिका प्राजक्ता निकम यांनी मुलांना शिक्षणाबरोबर कला-क्रीडा कौशल्य शिकविले. मात्र पुस्तकापलीकडे जात त्यांनी विद्यार्थ्यांबरोबरच नव्हे तर त्यांच्या पालकांकडून तेथील स्थानिक भाषा, संस्कृतीची शिकून घेतली.पालकांशी संवाद वाढवला आणि आज त्या सामाजिक भान जपत आहेत.

Web Title: The thing happened to mistress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.