त्या कर्मचा-यांचा भरतीप्रक्रियेत विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:46 AM2017-08-01T01:46:38+5:302017-08-01T01:46:48+5:30

आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे

Think of recruitment of those employees | त्या कर्मचा-यांचा भरतीप्रक्रियेत विचार

त्या कर्मचा-यांचा भरतीप्रक्रियेत विचार

Next

मुंबई : आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे, शैक्षणिक पात्रतेचे निकष आणि अनुभवानुसार कर्मचारी भरतीदरम्यान त्यांचा सहानुभूतीपूर्ण विचार करण्यात येईल, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग तीन व चार या वर्गवारीतील कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याबाबत उदयसिंग पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
सवरा म्हणाले, आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी तासिका आणि रोजंदारीवर कार्यरत आहेत. ते तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. पूर्वीच्या कर्मचाºयांना सरसकट भरतीने नियमित करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच शासनाने भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी या भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अनुभवाचा सहानुभूतीपूर्ण विचार शासन करेल, दरम्यान या कर्मचाºयांच्या मानधनात शासनाने वाढ केली असल्याचेही सवरा यांनी सांगितले.

Web Title: Think of recruitment of those employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.