मुंबईत स्वाईन फ्लूचा तिसरा बळी, भांडुप येथील गर्भवती महिलेचा मृत्यू
By admin | Published: May 22, 2017 08:05 PM2017-05-22T20:05:08+5:302017-05-22T20:58:17+5:30
राज्यभरात स्वाईन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईत स्वाइन फ्लूने तिसरा बळी घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - राज्यभरात स्वाईन फ्लूने थैमान घातले असताना मुंबईत स्वाइन फ्लूने तिसरा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी वरळीतील दीड वर्षीय मुलाच्या स्वाइन फ्लूने मृत्यु झाला होता. काही दिवसांपूर्वी कुर्ला येथील ७२ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. त्यानंतर आता १६ मे रोजी सायन रुग्णालयात भांडुप टिळकनगर येथील ३० वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
मूळची अलहाबादची असणारी ही महिला एक महिन्यांपूर्वी भांडुप येथे राहण्यास आली होती. ती महिला सात महिन्यांची गर्भवती होती, तिला ब्रॉन्कायल अस्थमा झाल्याचे निदान झाले होते. शिवाय, तिला काही दिवसांपासून कफ, छातीत दुखणे, श्वसनात अडथळा आणि उलट्यांचाही त्रास होत होता. १३ मे रोजी सायंकाळी तिला सावित्रीबाई फुले मेटर्निटी होममध्ये नेण्यात आले. तेथे तिला सायन रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी ७.२० वाजता तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी १६ मे रोजी सकाळी ११ वाजता तिचा ृमृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने भांडुप टिळकनगर परिसरातील ५२५ घरांतील २ हजार २६ व्यक्तिंची चाचणी केली असल्याचे सांगितले