तिसरी-चौथीच्या पाठ्यपुस्तकांत चुकांचा सुकाळ

By admin | Published: January 19, 2015 04:01 AM2015-01-19T04:01:08+5:302015-01-19T04:01:08+5:30

इतिहासाच्या अभ्यासक्रमातून वर्तमानकाळाला सामोरे जाण्याची व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, असा उद्देश असतो

Third-fourth textbooks | तिसरी-चौथीच्या पाठ्यपुस्तकांत चुकांचा सुकाळ

तिसरी-चौथीच्या पाठ्यपुस्तकांत चुकांचा सुकाळ

Next

संजय वाघ, नाशिक
इतिहासाच्या अभ्यासक्रमातून वर्तमानकाळाला सामोरे जाण्याची व भविष्याचा वेध घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, असा उद्देश असतो. मात्र बालभारतीच्या अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या तिसरी व चौथीच्या ‘परिसर अभ्यासा’च्या पुस्तकांत अनेक गंभीर चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीस प्रारंभ झालेला आहे. दोन्ही पुस्तकांतील राष्ट्रगीतात सिंध ऐवजी सिंधू तसेच ‘आशिष’ ऐवजी ‘आशिस’ असे चुकीचे छापलेले आहे. तिसरीच्या परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील चौथ्या प्रकरणातील पान क्र. २८ वरील आपले जग दर्शविणाऱ्या नकाशातील पृथ्वीगोलावर उत्तर धु्रवीय आर्क्टिक महासागर व दक्षिण धु्रवीय अंटार्क्टिका खंड एकाच दृष्टिक्षेपात एकाच वेळी खंडाच्या पूर्ण भूआकारात दाखविण्याचा चमत्कार केला आहे. तसेच दक्षिण व उत्तर अमेरिका खंडनकाशाचे विकृतीकरण झालेले आहे. सहाव्या प्रकरणातील पान क्र. ३४ वरील रायगड किल्ल्याचे चित्र एखाद्या पडक्या वाड्यासारखे प्रभावहीन वाटते. नवव्या प्रकरणातील पान क्र. ५५ वरील नाशिक जिल्ह्यातील प्रमुख भूरूपे दर्शविणाऱ्या नकाशासोबतच्या संदर्भ सूचीत खिंड दर्शविलेली नसताना धोडब खिंड दाखविली आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यात धोडब खिंडच अस्तित्वात नाही. चौथीच्या परिसर अभ्यास भाग पहिला या पाठ्यपुस्तकातील नवव्या प्रकरणात पान क्र. ५८वर वातावरणाची माहिती देताना पृथ्वीपासून उंच गेल्यास जवळ जवळ ५० कि.मी.पर्यंत हवा आहे, असे नमूद केले आहे. वास्तविक हवेचे थर त्यापेक्षाही जास्त उंचीवर असतात. (संदर्भ : मराठी विश्वकोश खंड १३वा चित्रपत्र क्र. ५८ शेवटचे पृष्ठ) ११व्या प्रकरणात पान क्र. ७३वर मेंदूसंबंधीच्या दोन चित्रांतील मेंदूचा रंग चुकीचा दाखविला आहे. वास्तविक मानवी मेंदूचा रंग फिकट गुलाबी (पिंक) असतो मात्र चित्रात फिकट निळसर दाखविण्याची गंभीर चूक झाली आहे. १६व्या प्रकरणात पान क्र. १०२ व १०३वरील दिवस आणि रात्र स्पष्ट करणाऱ्या माहितीत संपूर्ण वर्षात २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोनच तारखांना १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र असते, अशी चुकीची माहिती आहे. वास्तविक, २१ मार्च व २३ सप्टेंबरला दिवस आणि रात्र बारा-बारा तासांचे असतात. २२व्या प्रकरणाच्या पान क्र. १३६वरील ‘करून पहा’ या परिच्छेदात- मांजर, कुत्रा या प्राण्यांच्या यादीत चिमणी व कावळा यांनाही प्राणी म्हटले आहे.
चौथीच्या परिसर अभ्यास (शिवचरित्र) भाग २मधील सातव्या प्रकरणातील पान क्र. २६वरील तोरणा किल्ल्याच्या दुरुस्तीत मोहरांनी भरलेल्या चार घागरी सापडल्याचा उल्लेख आहे. याबाबत मतभेद आहेत. नवव्या प्रकरणाच्या पान क्र. ३३वरील किल्ले प्रतापगड म्हणून दिलेले चित्र गैरसमज निर्माण करणारे आहे. हे चित्र मुख्य किल्ल्याच्या खालील उतारावर किल्ल्याला जोडून पुढे आलेल्या एका सोंडेचे आहे. याच प्रकरणातील पान क्र. ३४वर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा याचा बडा सय्यद असा चुकीचा उल्लेख झालेला आहे.
१०व्या प्रकरणातील पान क्र. ३७वर शिवा काशिद याचा शिवाजी केशभुषाकार असा त्रोटक नामोल्लेख केलेला आहे. अशा चुकांमुळे विद्यार्थ्यांची दिशाभूल होण्याच्या शक्यता आहेत.

Web Title: Third-fourth textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.