तृतीयपंथीयांसाठी महामंडळ हवे

By admin | Published: October 24, 2016 05:29 AM2016-10-24T05:29:40+5:302016-10-24T05:29:40+5:30

आमचे प्रश्न, समस्या आम्ही सोडवू; मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्यावेत. आमचे महामंडळ स्थापन केल्यास आमचे अनेक गंभीर प्रश्न सुटतील

For the third party, the corporation needs | तृतीयपंथीयांसाठी महामंडळ हवे

तृतीयपंथीयांसाठी महामंडळ हवे

Next

कोल्हापूर : आमचे प्रश्न, समस्या आम्ही सोडवू; मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्यावेत. आमचे महामंडळ स्थापन केल्यास आमचे अनेक गंभीर प्रश्न सुटतील, अशी मागणी किन्नर आखाडा प्रमुख आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी रविवारी येथे केली.
आमच्यासाठी कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेचा निर्णय
पंधरा दिवसांत घ्यावा; अन्यथा
राज्य सरकारला न्यायालयात
खेचू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि फेथ फाउंडेशनतर्फे आयोजित ‘अस्तित्व’ या परिसंवादानिमित्त त्या कोल्हापुरात आल्या होत्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यानुसार रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र मिळणे हा तृतीयपंथीय, जोगते, वारांगना सर्वांचाच अधिकार आहे. समाजाची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलल्याविना आमचे प्रश्न सुटणार नाहीत.
या परिस्थितीला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. तृतीयपंथीयांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र, अद्यापही त्या दृष्टीने समितीच्या नियुक्तीचेही काम झालेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी आमच्या कल्याणकारी मंडळासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता; पण, गेल्या दोन वर्षांत हा निधी कुठे गेला? हा निधी आम्हाला द्यावा. निधीचे काय केले ते सांगावे, अशीही मागणी त्रिपाठी यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)

Web Title: For the third party, the corporation needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.