तिस-या अपत्यामुळे संचालकपद रद्द
By admin | Published: August 9, 2016 09:46 PM2016-08-09T21:46:34+5:302016-08-09T21:46:34+5:30
तिस-या अपत्यामुळे एका संचालकावर पद रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत हा प्रकार घडला आहे.
Next
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
भंडारा, दि. 09 - तिस-या अपत्यामुळे एका संचालकावर पद रद्द होण्याची नामुष्की ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेत हा प्रकार घडला आहे. सदर संचालकाचे पद रद्द करण्याचा निर्वाळा भंडारा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी दिला.
निवडणूक लढणा-या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणूक लढता येत नाही. यापूर्वी अपत्य लपविणाºया उमेदवारांचे पद रद्द झाल्याची नामुष्की अनेकांवर ओढावली आहे. भंडारा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक मार्तंड गायधने यांना तीन अपत्य असल्याने संचालकपद रद्द झाले आहे.
मोहदुरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.मार्तंड गायधने यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेची संचालकपदाची निवडणूक लढविली होती. यात ते निवडून आले. दरम्यान गणेशपूर येथील विजय भुरे यांनी त्यांच्याविरुद्ध सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत गायधने यांना तीन अपत्य असल्याचे पुरावे सादर केले. भुरे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी कागदपत्रांची तपासणी करून गायधने यांच्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९० चे कलम ७३ क अ (७) नुसार अपात्रतेची कारवाई केली.
ही कारवाई होण्यापूर्वी सहाय्यक निबंधकांनी गायधने यांना बाजू मांडण्याची संधी दिली. यात त्यांना दिलेल्या वेळेत त्यांनी हजेरी न लावता उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणाची सुनावणी ५ आॅगस्टला ठेवण्यात आली होती. यात भुरे यांनी केलेली तक्रार योग्य असून ती मान्य असल्याचे गायधने यांनी कबुल केले. याप्रकरणी सहाय्यक निबंधक पी.एन. शेंडे यांनी गायधने अपात्र असून संचालक मंडळातून बरखास्त करण्याचे आदेश पारीत केले.