तिसरी विशेष फेरी आजपासून

By admin | Published: August 24, 2016 01:02 AM2016-08-24T01:02:22+5:302016-08-24T01:02:22+5:30

केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

The third special round today | तिसरी विशेष फेरी आजपासून

तिसरी विशेष फेरी आजपासून

Next


पुणे : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. २४) विद्यार्थ्यांना आॅनलाइन पसंती क्रम अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, दुसऱ्या विशेष फेरीत १ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. सध्या विशेष फेरीतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. या फेरीतील दुसरा टप्पा मंगळवारी पूर्ण झाला. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ४ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८८८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यातील १ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत.
अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी विशेष फेरी घेतली जाणार आहे. या फेरीसाठी बुधवारी दुपारी दोन वाजता रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे. या फेरीसाठी दि. २४ व २५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना पुन्हा आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. त्यानुसार दि. २६ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या यादीनुसार दि. २७ आणि दि. २९ व ३० आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. दुसऱ्या विशेष फेरीप्रमाणे महाविद्यालयनिहाय रिक्त जागा व कटआॅफ पाहून किमान ५ व कमाल १५ पसंतीक्रम भरावे लागतील.
>विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश फेऱ्यांमध्ये मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असेल, तर त्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम टाकू नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे. पुढील प्रवेशफेरी दहावी फेरपरीक्षेच्या निकालानंतर घेतली जाणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे टेमकर यांनी सांगितले.

Web Title: The third special round today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.