CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:16 AM2021-06-18T07:16:55+5:302021-06-18T07:17:47+5:30

राज्यातील तज्ज्ञांच्या मतांवर आक्षेप. डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते.

A third wave of corona is not expected in Maharashtra; Central Government claim | CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

Next

- हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. महाराष्ट्रातील कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हे विधान केले होते. त्यावर राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीच्या कार्यगटातील (एनटीएजीआय) सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 

डॉ. शशांक जोशी म्हणाले होते की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट ओसरल्यानंतर चार आठवड्यांतच तिसरी लाट आली होती. लोकांनी नीट दक्षता घेतली नाही व नियम पाळले नाहीत तर हीच स्थिती आपल्याकडेही उद्भवू शकते. महाराष्ट्रासह देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. लसीकरणाचा वेगही वाढविण्यात आला आहे. अशा वेळी लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणारे वक्तव्य डॉ. जोशी यांनी केले आहे, असा आक्षेप एनटीएजीआयमधील तज्ज्ञांनी घेतला.  
एनटीएजीआयचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अशा वक्तव्यांची केंद्र सरकार योग्य दखल घेईल, असे ते म्हणाले. 

शास्त्रीय निरीक्षणाची जोड नाही
एनटीएजीआयने म्हटले आहे की, महाराष्ट्रात येत्या दोन ते चार आठवड्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, या वक्तव्याला कोणत्याही शास्त्रीय निरीक्षणाची जोड नाही. देशातील ५० ते ६० टक्के जनतेला सामूहिक प्रतिकारशक्तीचे संरक्षण लाभलेले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत तरी तिसरी लाट येण्याची शक्यता नाही. याआधी केलेल्या सिरो सर्वेक्षणांतही ही बाब स्पष्ट झाली आहे. 

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका नाही : एम्स
n सध्या अस्तित्वात असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रकारांमुळे या साथीच्या तिसऱ्या  लाटेत २ वर्षे किंवा त्यापुढील वयाच्या मुलांवर विपरित परिणाम होणार नाही, असे एम्सने केलेल्या नव्या पाहणीच्या निष्कर्षांत म्हटले आहे. 
n या पाहणीसाठी १५ मार्च ते १० जून या कालावधीत कोरोना विषाणू व रुग्णांविषयी दिल्ली, भुवनेश्वर, आगरतळा आदी ठिकाणांहून माहिती गोळा करण्यात आली होती.

३०% लोकांना लसीचा किमान एक डोस जरी मिळाला असेल तर कोरोनाची आणखी लाट लगेचच येण्याची शक्यता उरत नाही. 

Web Title: A third wave of corona is not expected in Maharashtra; Central Government claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.