‘थर्टी-फर्स्ट’ला ७९१ जीव वाचवले
By admin | Published: January 9, 2015 01:50 AM2015-01-09T01:50:11+5:302015-01-09T01:50:11+5:30
रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. या सुविधेकरिता १०८ हा टोल फ्री कमांक देण्यात आला आहे.
रूपेश खैरी ल्ल वर्धा
रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचविण्याकरिता राज्य शासनाच्या वतीने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. या सुविधेकरिता १०८ हा टोल फ्री कमांक देण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘थर्टी फर्स्ट’ला एकाच
दिवशी तब्बल ७९१ जणांनी हा क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत मागितली आहे.
रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमींना वेळीच आवश्यक औषधोपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.
अपघातातील गंभीर जखमींचे जीव वाचविण्याकरिता राज्य शासनाने आकस्मिक वैद्यकीय सेवा सुरू केली. त्याकरिता राज्यात अद्ययावत सुविधायुक्त ९३७ रुग्णवाहिका पुरविण्यात
आल्या. यात अत्यावश्यक १२ प्रकारच्या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात या योजनेंतर्गत १६४ रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यांचा वर्षभरात एकूण १८ हजार ६७४ नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या रुग्णवाहिकेत तज्ज्ञ डॉक्टरही देण्यात आले.
अहमदनगर३१
अकोला१५
अमरावती२१
औरंगाबाद३७
बीड२४
भंडारा१७
बुलढाणा२२
चंद्रपूर२९
धुळे१५
गडचिरोली३
गोंदिया८
हिंगोली७
जळगाव२२
जालना१८
कोल्हापूर२५
लातूर२६
मुंबई६८
नागपूर३६
नांदेड३२
नंदुरबार११
नाशिक३७
उस्मानाबाद१०
परभणी१४
पुणे४९
रायगड ८
रत्नागिरी१०
सांगली२३
सातारा३१
सिंधुदुर्ग८
सोलापूर४६
ठाणे४९
वर्धा२
वाशिम१३
यवतमाळ२४
च्पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्णात या योजनेंतर्गत १६४ रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यांचा वर्षभरात एकूण १८ हजार ६७४ नागरिकांनी लाभ घेतला आहे. डिसेंबरमध्ये दोन हजार ७३९ तर नागरिकांनी १०८ क्रमांक डायल केला