कोल्हापुरात तृतीयपंथीयांने केला तरुणाचा खून
By admin | Published: June 6, 2017 08:33 PM2017-06-06T20:33:42+5:302017-06-06T20:33:42+5:30
येथील ताराबाई रोडवरील लक्ष्मी टॉकीज परिसरात खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 6 - येथील ताराबाई रोडवरील लक्ष्मी टॉकीज परिसरात खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शुभम तानाजी पोवार (वय २३, रा. ईश्वर अपार्टमेंट, राजारामपुरी, तिसरी गल्ली) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलिसांनी संशयित तृतीयपंथी हिनासह तिघा तरुणांना ताब्यात घेतले.
हिनाचे मुंबई-पुण्यातील तृतीयपंथीयांशी कनेक्शन आहे. तिने तब्बल दहा लाख रुपये खर्चून शस्त्रक्रिया करून आपण सुंदर स्त्री दिसेल असे प्रयत्न केले आहेत. तिला पाहिल्यानंतरही कोणच तिला तृतीयपंथी आहे असे म्हणू शकणार नाही. त्यामुळे तरुण मुले तिच्यावर फिदा होत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यातूनच वैमनस्यातून हा खून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.
हिना रात्रीच्या वेळी मध्यवर्ती बसस्थानकासह शहराच्या वेगवेगळ््या भागात फिरत असते. नेहमी तिच्या अवतीभोवती तरुणांचा गराडा असतो. मध्यरात्री बारा ते पहाटे चारपर्यंत ती फिरत असताना पोलिसांच्या नजरेसही पडते; परंतु पोलीस तिच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नव्हते. उच्चभ्रू तरुणांशी तिची मैत्री आहे. ते तिला आलिशान गाड्यातून रात्रीच्या वेळी फिरवित असतात. तिला दारू पिणे, गांजा ओढण्याची सवय आहे.
शुभम पोवार राजारामपुरीतील खाऊ गल्लीत खाद्यपदार्थांच्या गाड्यावर कामाला होता. आई-वडिलांचे छत्र हरवल्याने तो मामा अमित कोंडेकर यांच्याकडे राहत होता. रविवारी (दि. ४) रात्री मामाच्या घरी जेवल्यानंतर राजारामपुरी येथील तिसºया गल्लीत मित्रांसोबत बोलत थांबला होता. यावेळी बाजूने चाललेल्या हिनाशी त्याचा वाद झाला. तिने बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे ताराबाई रोडवरील लक्ष्मी टॉकीज परिसरात शुभम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. नागरिकांनी त्याच्या मामाला फोन करून बोलावून घेतले. उपचार सुरू असताना शुभमचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून हिनासह तिच्या तिघा मित्रांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे करीत आहेत.
पूर्व वैमनस्यातून हल्ला-
शुभमने हिनाला हाक मारल्यानंतर का थांबली नाहीस, असे म्हणून शिवीगाळ केली होती. शुभम हा रविवारी मध्यरात्री मित्राला घेऊन दूचाकीवरून लक्ष्मी टॉकीज परिसरात आला होता. याठिकाणी हिनासह तिचे तिघे मित्र होते. शुभमने दुचाकी हिनाच्या समोर उभी केली. यावेळी त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. त्यातून तिच्यासह मित्रांनी शुभमला दुचाकीवरून खाली ओढले. त्यामध्ये रस्त्यावर पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी डोक्यात फणसही घातला. त्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला होता, अशी माहिती त्याच्या मित्रासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पोलिसांना दिली. हिनासह तिच्या मित्रांकडे पोलीस चौकशी करीत आहेत. शुभम पूर्वीपासून हिनासोबत असे. यापूर्वी त्यांच्यात जोरदार वादावादी व हाणामारी झाली होती. त्या रागातून हा खून झाल्याचे तपासात पुढे येत आहे.