कर्जमाफीसाठी ठाण्यातून ३० हजार अर्ज दाखल, कर्जमाफीचे फॉर्म तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 03:56 AM2017-09-22T03:56:20+5:302017-09-22T03:56:44+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य शासन शेतक-यांना कर्जमाफी करत आहे. यासाठी सुमारे ६६ कॉलममध्ये शेतक-यांना माहिती भरावी लागत आहे. जिल्हा बँकांवरही जबाबदारी देण्यात आली आहे. यानुसार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठाणे व पालघर जिल्ह्यांतील ३० हजार २१५ शेतकºयांची ६६ कॉलममध्ये मॅन्युअली माहिती भरून घेतली. याशिवाय, १५ हजार ५९८ फॉर्मही शेतकºयांना आॅनलाइन अपलोड करून दिल्याचा दावा केला आहे.
शासनाने ठिकठिकाणी ई-महासेवा केंद्रे सुरू केली आहेत. त्या ठिकाणी कर्जमाफीचे फॉर्म विनामूल्य शेतकºयांना स्वत: अपलोड करणे अपेक्षित होते. मात्र, ते शक्य झाले नसते. शेतकºयांची ही समस्या दूर करण्यासाठी टीडीसीसी बँकेने सुमारे ५९ शाखांमध्ये आॅनलाइन मोफत सेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी बँकेचे सुमारे ५५८ कर्मचारी मनुष्यबळ कार्यरत ठेवले आहे. राज्यात केवळ आमच्याच बँकेने ही सेवा शेतकºयांना उपलब्ध करून दिल्याचा दावा टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे यांनी केला.
कर्जमाफीचे अर्ज शुक्रवारपर्यंत भरून घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३० हजार २१५ शेतकºयांचे फॉर्म भरून घेतले आहेत. पण, आता २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ शासनाने दिली आहे. पण, आधीच जिल्ह्यातील सर्व शेतकºयांचे फार्म भरून घेण्यासह अपलोडही केले. ठाणे जिल्ह्यातील शेतकरी सुमारे २०७ शेती संस्थांशी संलग्न आहेत. त्यातील १४ हजार ७११ शेतकºयांचे अर्ज भरून घेतले आहेत. त्यातील सात हजार ९८७ शेतकºयांचे अर्ज आॅनलाइन अपलोड केले आहेत.
शेतकºयांचे कर्जमाफीचे फॉर्म तालुकास्तरीय लेखा अधिकाºयांकडून तपासणी करूनच अपलोड होत आहे. अपलोड झालेले कर्जमाफीचे अर्ज तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार तपासणार आहेत.
यानंतर, हा संपूर्ण डाटा पुन्हा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासला जाणार आहे. यानंतर, हा संपूर्ण डाटा विभागीय आयुक्तांद्वारे शासनाकडे कर्जमाफीच्या लाभासाठी जाणार आहे.