सोळा लाखांचे दागिने हॉटेलमधून चोरीस

By admin | Published: December 28, 2015 01:24 AM2015-12-28T01:24:56+5:302015-12-28T01:24:56+5:30

येथील हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे लग्नसमारंभासाठी आलेल्या एका महिलेचे ६५ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे १६ लाख २५ हजार रुपयांचे दागिने रूममधून चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी

Thirty million jewelery stolen from the hotel | सोळा लाखांचे दागिने हॉटेलमधून चोरीस

सोळा लाखांचे दागिने हॉटेलमधून चोरीस

Next

लोणावळा : येथील हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे लग्नसमारंभासाठी आलेल्या एका महिलेचे ६५ हजारांच्या रोख रकमेसह सुमारे १६ लाख २५ हजार रुपयांचे दागिने रूममधून चोरीस गेल्याची घटना शुक्रवारी (दि. २५) रात्री घडली.
सुनीता संजय जैन (वय ४८, रा. अंधेरी, मुंबई) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता जैन आणि त्यांची जाऊ नूतन संतोष जैन या दोघी २३ डिसेंबर रोजी लग्नासाठी हॉटेल बिजीस हिल रीट्रीट येथे आल्या होत्या. त्यांनी त्यांचे सोने, तसेच हिऱ्यांचे दागिने सोबत आणले होते. २४ डिसेंबरच्या रात्री संगीतसंध्या हा कार्यक्रम संपल्यावर मध्यरात्री १२.३०ला दोघी आपल्या रूममध्ये येऊन झोपी गेल्या. २५ डिसेंबरला पहाटे ५.३०ला नूतन या झोपेतून उठल्या आणि स्नान झाल्यावर ६.३०च्या सुमारास तयार होण्यासाठी ड्रेसिंग टेबलकडे गेल्या असता, दागिने नसल्याचे लक्षात आले.
दिवसभर शोधाशोध करूनही दागिने न सापडल्याने २६ डिसेंबरला पोलीस तक्रार करण्यात आली. या चोरीमध्ये ६५ हजार रोख रक्कम, दीड लाखाची गळ्यातील हिऱ्याची माळ, चार लाखांचा हिऱ्याचा सेट, दोन लाख ८५ हजारांचा सोन्याचा हार, ७५ हजारांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, तीन लाखांचा गळ्यातील हिऱ्याचा हार, ९० हजारांचा सोन्याचा हार, ७५ हजारांची सोन्याची चैन, एक लाखाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ३० हजारांचे डोक्यात घालायचे बोर, १५ हजारांची सोन्याची अंगठी, एक लाखाची हिऱ्याची बांगडी आदी ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीलेश अपसुंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Thirty million jewelery stolen from the hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.