ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यात 25 बालमृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 09:24 PM2017-07-24T21:24:50+5:302017-07-24T21:24:50+5:30
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागात सहा महिन्याच्या कालावधीत 25 बालमृत्यू झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 24 - जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी, दुर्गम भागात सहा महिन्याच्या कालावधीत 25 बालमृत्यू झाले. यातील 15 बालमृत्यू जून महिन्यात झाले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जिल्ह्यात चांगले काम करा, अन्यथा निघून जा. या पुढे कोठेही बालमृत्यू होताच संबंधीत बीडीओ, वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचा:यांची जिल्ह्यातून तडकाफडकी करण्याचे आदेश ही त्यांनी प्रशासनाला दिले.
येथील समिती सभागृहात गाभा समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी प्राप्त झालेल्या अहवालावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिका:यांवर ताशेरे ओढले आहे. सहा महिन्याच्या कालावधीत दगावलेल्या 25 बालकांपैकी एक वर्षापर्यतचे 22 बालके असून त्यात अर्भकमृत्यूंचाही समावेश आहे. उर्वरित तीन बालके पाच वर्षार्पयतची आहेत. दगावलेल्या या बालकांपैकी सर्वाधिक दहा बालके शहापूर तालुक्यातील आहेत. यामधील आठ बालके क् ते 1 वर्षातील आहेत, तर दोन पाच वर्ष वयोगटार्पयतची आहेत. याशिवाय सात मुरबाड तालुक्यात दगावले आहेत. भिवंडी तालुक्यातील पाच बालकांचा समावेश असून कल्याण तालुक्यामधील दोन बालके तर अंबरनाथमधील एका बालकाचा समावेश आहे. या 25 बालकांमध्ये 15 बालके जून महिन्यात दगावले आहेत.
केवळ आकडेवारी देऊन चालणार नाही. काम करणा-या अधिका-यांनीच जिल्ह्यात राहायचे. या पुढे ज्या ठिकाणी बालमृत्यू होईल तेथील बीडीओ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचा-यांची त्यास दिवशी बदली करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले. कुपोषण व बालमृत्यूच्या कारणांचा शोध घ्या, पालकांच्या रोजगार संबंधीत जॉब कार्डाची तहसीलदारांनी तपासणी करा, तीन वर्षात किती मनरेगाचा कोठे किती खर्च झाला शोध घ्या, पालकाना अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा होतो की त्यात घोळ आहे, याचा शोध घ्या. कुपोषीत बालके दत्तक घेणा-या अधिका-यांनी संबंधीत बालकांची काय दखल घेतली, किती वेळा भेट दिली, याविषयीचे हेल्थकार्ड तपासणी करा. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कुपोषीत बालके, त्यांचे पालक आदींच्या त्वरीत बैठका लावून कारणांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनावणो, आदींसह गाभासमितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.