तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

By admin | Published: August 9, 2016 04:03 AM2016-08-09T04:03:24+5:302016-08-09T04:03:24+5:30

बहुचर्चित बाळगंगा सिंचन प्रकल्पाच्या बांधकाम घोटाळ्यात कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी

Thirty thousand page chargesheet | तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

तब्बल ३० हजार पानांचे आरोपपत्र

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
बहुचर्चित बाळगंगा सिंचन प्रकल्पाच्या बांधकाम घोटाळ्यात कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर यांच्यासह १० जणांवर ३० हजार पानांचे आरोपपत्र सोमवारी ठाण्याच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. धरणाचे चुकीचे संकल्पचित्र वापरून कामाच्या स्वरूपात वाढ करत राज्य सरकारचे ९२ कोटी ६३ लाख ४२ हजार ११० रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका या आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बांधल्या जाणाऱ्या बाळगंगा प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होऊ लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. एसीबीच्या विशेष चौकशी पथकाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी कोपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. कोकण पाटबंधारे विभागाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील, ठाणे पाटबंधारे मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता रामचंद्र शिंदे, रायगड पाटबंधारे विभाग-१ कोलाडचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आनंदा काळुखे, कोलाडचे तत्कालीन सहायक अभियंता राजेश रिठे, कोलाडचे तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट आणि एफए कन्स्ट्रक्शन आणि एफए एंटरप्रायजेसचे भागीदार फतेह मोहंमद अब्दुल्ला खत्री, निसार खत्री, अबीद फतेह खत्री, झाहीद फतेह खत्री आदी १० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने धरणाच्या बांधकामासाठी २००९ मध्ये निविदा मागवल्या होत्या.
त्यात चार ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतल्याचे दाखवण्यात आले. त्यात एफए एंटरप्रायजेस या कंपनीला बाळगंगा धरणाच्या कामाचा ठेका मिळाला. एफए एंटरप्रायजेसचे भागीदार निसार खत्री व इतरांनी निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचे भासवले. त्यांनी आरएन नायक आणि सन्स,
हुबळी या कंपनीने निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याचे भासवले.


या अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता...
च्गिरीश बाबर यांच्यासह १४ जणांच्या घरझडतीत २५ आॅगस्ट २०१५ रोजी करोडो रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.
गरीश बाबर - ३२ हजार ५०० ची रोकड, राहुरी येथील जमिनीची कागदपत्रे
बाळासाहेब पाटील - कोल्हापूर येथे दोन मजली आरसीसी बंगला, विविध बँक खात्यात ६८ लाख ३८ हजारांची रोकड, कार जमिनीसह करोडोंची मालमत्ता.
रामचंद्र शिंदे - पुणे ६० लाखांचा फ्लॅट, विविध बँक खात्यात १८ लाख ८१ हजार, दोन कोटी ३७ लाखांच्या सोन्याचे दागिने, सोलापूरसह विविध ठिकाणी जमिनी.
आनंदा काळुखे - पत्नी आणि स्वत:च्या नावाने कल्याणसह विविध ठिकाणी ६४ लाखांच्या सहा सदनिका, एक लाख ९९ हजारांची बँक शिल्लक, २० लाख आठ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच विविध ठिकाणी जमिनी अशी करोडो रुपयांची मालमत्ता.
राजेश रिठे (निलंबित अभियंता)- चंद्रकांत रिठे यांचे नावे इंदापूरसह विविध ठिकाणी जमिनी अशी ७० ते ८० लाखांची मालमत्ता.
विजय कासट - कल्याण येथे एक लाख ६३ लाखांचा फ्लॅट, नाशिक येथे ३० लाख ८० हजारांची जमीन, याशिवाय, भिवंडी, दिंडोरी येथेही जमिनी, चार लाख ४२ हजारांची रोकड, तीन लाख ६० हजारांचे १९ तोळे दागिने.
नसारा खत्री (कंत्राटदार) - खार येथे चार इमारती (२७ हजार २०० चौ. फुटांचे चटई क्षेत्र), १२०० ग्रॅम सोने आणि तीन किलो चांदी निवासस्थानी मिळाली. इमारतीच्या आवारात १३ वाहने. त्यात तीन मर्सिडीज बेण्झ, ३ स्कोडा आणि एका आॅडीचाही समावेश. ही सर्व मालमत्तेचीही माहिती आता आरोपपत्रात एसीबीने न्यायालयाला दिली आहे.

Web Title: Thirty thousand page chargesheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.