तमाशापंढरीत २९ राहुट्या दाखल

By Admin | Published: March 4, 2017 01:09 AM2017-03-04T01:09:05+5:302017-03-04T01:09:05+5:30

महाराष्ट्राची लोककला असलेल्या लोकनाट्य तमाशा फडाच्या २९ राहुट्या नारायणगाव येथील तमाशापंढरीत दाखल झाल्या आहेत़

Thirty-two lodging cases were registered | तमाशापंढरीत २९ राहुट्या दाखल

तमाशापंढरीत २९ राहुट्या दाखल

googlenewsNext


नारायणगाव : महाराष्ट्राची लोककला असलेल्या लोकनाट्य तमाशा फडाच्या २९ राहुट्या नारायणगाव येथील तमाशापंढरीत दाखल झाल्या आहेत़ विविध भागांत होणाऱ्या जत्रांसाठी तमाशा खेळाच्या सुपाऱ्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत़ या तमाशा राहुट्यांचे अक्षय्य तृतीयापर्यंत वास्तव्य राहणार आहे़
वल्लभ बेनके तमाशा कलापंढरीमध्ये लोकनाट्य तमाशा फडाच्या राहुट्या उभारणीला १२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे़ सध्या तमाशापंढरीत २९ राहुट्यांचे आगमन झाले आहे़ सध्या तमाशा फडांमध्ये बाळ आल्हाट नेतवडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकरसह तुकाराम खेडकर, हरिभाऊ बढेसह नंदाराणी नगरकर, आनंद लोकनाट्य तमाशा मंडळ, दत्ता महाडिक पुणेकर, कुंदा पाटील पुणेकर, मालती इनामदार नारायणगावकर, काळू-नामू वेळवंडकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, संध्या माने सोलापूरकर, संभाजी जाधव संक्रापूरकर, रघुवीर खेडकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, अंजली नाशिककर, ईश्वरबापू पिंपरीकर, छाया खिल्लारे बारामतीकर, भिका-भीमा सांगवीकर, मंगला बनसोडे करवडीकर, मनीषा सिद्धटेककर, नंदाराणी भोकरे साकुर्डीकर, वामनराव पाटोळे मेंढापूरकर, सर्जेराव जाधव दावडीकर, उषा पाटील खोमणे औरंगाबादकर, संगीता महाडिक पुणेकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर, पुष्पा बरडकर कृष्णा वाघमोडे, सुनीता बारामतीकरसह रमेश खुडे आदी तमाशा फडाच्या राहुट्या उभारण्यात आलेल्या आहेत़ आणखी काही नावाजलेल्या राहुट्यांचे आगमन होणे बाकी आहे़ दरवर्षीप्रमाणे ग्रामस्थ व मुक्ताबाई ट्रस्टचे कमिटी सदस्य व माजी आमदार वल्लभ बेनके, तसेच तमाशापंढरीचे अध्यक्ष गणपत कोकणे, उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल, संजय अडसरे, अभय खैरे, दाजी कोऱ्हाळे यांच्या सहकार्याने राहुट्यांसाठी जागा व विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी नळ-पाणीपुरवठा कनेक्शन दिले आहे. परंतु त्याला पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे राहुटीतील फडमालक/व्यवस्थापक यांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीने नळ कनेक्शनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे व राहुट्यांची संख्या लक्षात घेऊन ३ ते ४ नळ कनेक्शन द्यावेत, अशी मागणी तमाशापंढरीचे अध्यक्ष गणपत कोकणे व उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल यांनी केली आहे़ (वार्ताहर)
या तमाशापंढरीत राज्यातील कानाकोपऱ्यांतून ग्रामस्थ, स्थानिक पुढारी, पाटील, पंच, यात्रा उत्सवाच्या कमिटीचे सदस्य येऊन आपल्या गावातील यात्रा-जत्रेसाठी लोकनाट्य तमाशा खेळाचे बुकिंग करतात़ अर्थात, तमाशा खेळाची सुपारी दिली जाते़ दरवर्षी येथील तमाशापंढरीत साधारणपणे ३५ हून फडांच्या राहुट्यांचे वास्तव्य असते़ राहुट्यांच्या ठिकाणी वास्तव्यास असलेले फडमालक किंवा त्यांचे व्यवस्थापक येथे लोकनाट्य तमाशा बुकिंगची सुपारी घेतात़

Web Title: Thirty-two lodging cases were registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.