"हा बाळासाहेबनिष्ठ आणि पवारनिष्ठ यांच्यातला लढा", भाजप नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 10:49 AM2022-06-21T10:49:27+5:302022-06-21T10:49:59+5:30

Vidhan Parishad Election: काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे.

"This is a battle between Balasaheb's loyalists and Pawar's loyalists", said the BJP leader Keshav Upadhye | "हा बाळासाहेबनिष्ठ आणि पवारनिष्ठ यांच्यातला लढा", भाजप नेत्याचा खोचक टोला

"हा बाळासाहेबनिष्ठ आणि पवारनिष्ठ यांच्यातला लढा", भाजप नेत्याचा खोचक टोला

Next

मुंबई- काल झालेल्या विधान परिषद निकालानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले असले तरी एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या बंडावर मोठे वक्तव्य केले आहे.

कालच्या निकालानंतर आज केशव उपाध्ये यांनी ट्विट करत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, "शिवसेनेतील सध्याचा लढा हा अस्सल बाळासाहेबनिष्ठ विरुध्द पवारनिष्ठ यांच्यातला आहे. बाळासाहेबांच्या निष्ठांवतांना हिंदुत्व सोडलेले आवडले नाही, काँग्रेसला मतदान करणे पटलेलं नाही. पदासाठी राष्ट्रवादीची दमदाटी सहन करण रुचल नाही," असे उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदेंसोबत 25 आमदार?; ठाकरेंचे चार मंत्रीही नॉट रिचेबल
विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले असले तरी एकनाथ शिंदेंनी अचानक बंड पुकारल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  एकनाथ शिंदे काही शिवसेना आमदारांना घेऊन गुजरातला गेल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्यासोबत जवळपास 25 आमदार गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: "This is a battle between Balasaheb's loyalists and Pawar's loyalists", said the BJP leader Keshav Upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.