'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:39 PM2023-06-15T15:39:54+5:302023-06-15T15:40:44+5:30

ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे.

This is a fevicol joint, it will not break CM eknath Shinde spoke candidly on his friendship with devendra Fadnavis Shiv sena bjp | 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

googlenewsNext

शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून, गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात, प्रामुख्याने युतीत काही बिनसले की काय? अशी चर्चा सुरू होती. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलताना फडणविसांसोबत असलेल्या त्यांच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचे बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही', असे म्हटले आहे.  

"ये फेविकॉल का जोड है..."
एकनाथ शिंदे म्हणाले, माझी आणि देवेंद्रजींची मैत्री आताची नाही. ती गेल्या १५ -२०  वर्षांपासून आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी, आमचं बाँडिंग मजबूत आहे. 'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही.' तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी, तुटणार नाही. काही लोक म्हणतात ही जय विरूची जोडी आहे. काही म्हणतात धरम-वीरची जोडी आहे. पण मी सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ती खुर्चीसाठी झालेली नाही, स्वार्थासाठी झालेली नाही आणि जे स्वार्थासाठी  एकत्र आले होते. त्यांना या जनतेनेच बाजुला करून टाकले आहे." 

आम्ही 'तो' मिठाचा खडा खड्यासारखा काढून टाकला -
"ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे. बाळासाहेब आणि अटलजींचे विचार, प्रमोद जी, गोपिनाथ जी असतील आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. यात गेल्या वर्षापूर्वी टाकला होता पण आम्ही तो मिठाचा खडा खड्यासारखा काढून बाजूला टाकला आणि भक्कम युती झाली. लोकांच्या मातलं सरकार आम्ही स्थापन केलं. यामुळे कितीही कुणी म्हटलं तरी आमच्यात कसल्याही प्रकारची दरी निर्माण होऊ शकत नाही. काहण हे एका विचाराचं सरकार आहे," असेही शिंदे म्हणाले. 

...त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना 84 टक्के लोकांची पसंती - 
एवढेच नाही, तर "२०१९ रोजी सर्वसामान्यांनी शिवसेना भाजप युतीला मतदान केलं. पण सरकार वेगळ्याच लोकांबरोबर स्थापन झालं. पण गेल्या १०-११ महिन्यांपूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि या राज्यात सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. यामुळे राज्य सरकारला काही लोक पसंती देत आहेत. राज्य सरकार लोकांनी पसंत केलंय. पण मला, या गोष्टीचा आनंद आहे की, त्या सर्व्हेत पंतप्रधान मोदींना तब्बल 84 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. या देशाचा सन्मान जगभरात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे," असेही शिंदे म्हणाले  

...याचा अभिमान आम्हाला अधिक -
"सध्या अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि ते केवळ देशातच नाही, तर संपूर्ण जगात आज लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याचा अभिमान आम्हाला अधिक आहे. यामुळे सत्ता वैगेरे यांचा कुणालाही मोह नाही. हा एकनाथ शिंदे काय? देवेंद्र फडणवीस काय? आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही करत आहोत आणि उद्याही करत राहणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही. आमचे पाय आजही जमिनीवर आहोत," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले.


 

Web Title: This is a fevicol joint, it will not break CM eknath Shinde spoke candidly on his friendship with devendra Fadnavis Shiv sena bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.