हा महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा प्रकार, आता CM आणि DCMदेखील डुप्लिकेट आणा, वडेट्टीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:45 PM2024-02-29T12:45:19+5:302024-02-29T12:46:14+5:30

Vijay Vadettiwar Criticize Maharashtra Government: हे सर्व नेमकं चाललंय काय,याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत  महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री,उपपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा अशी टीका केली

This is Maharashtra's scam, now CM and DCM also bring duplicates, criticizes Vijay Vadettiwar | हा महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा प्रकार, आता CM आणि DCMदेखील डुप्लिकेट आणा, वडेट्टीवार यांची टीका

हा महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा प्रकार, आता CM आणि DCMदेखील डुप्लिकेट आणा, वडेट्टीवार यांची टीका

मुंबई -  मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्याच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि शिक्के असलेली बनावट निवेदने आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना होतात हे गंभीर आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पॉंईट ऑफ इनफॉर्मेशनच्या माध्यमातून ही मागणी केली.

वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वी सुद्धा विशेष कार्यकारी अधिकारी सहा महिने तोतया म्हणून कार्यरत होता. जर राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच तसेच मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात राजरोसपणे तोतया विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून वावरत होता. इतकेच नव्हे तर त्या तोतयाने आठ महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या. कर्मचाऱ्यांच्या  बदल्या, शासकीय दस्ताऐवज यांमध्ये हस्तक्षेप तो करत होता. स्वतः फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायचा आणि स्वाक्षरी  घेऊन यायचा. तो खरा आहे की खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे हे देखील मुख्यमंत्र्याना माहीत नव्हते ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची बाब आहे. हा सर्व गोंधळ  बघता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी सुरू आहे सर्व जनतेला दिसत आहे. हे सर्व नेमकं चाललंय काय,याकडे शासन जबाबदारीने बघणार आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत  महाराष्ट्राचे धिंडवडे काढण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री,उपपमुख्यमंत्री देखील डुप्लिकेट आणा अशी टीका केली.

या प्रकरणाची राज्यसरकारने गंभीरतेने दखल घेतली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाय त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे  स्पष्टीकरण सरकारकडून  यावेळी देण्यात आले. 

Web Title: This is Maharashtra's scam, now CM and DCM also bring duplicates, criticizes Vijay Vadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.