"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 04:36 PM2024-09-03T16:36:41+5:302024-09-03T16:40:27+5:30

Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे.

"This is not development of mumbai, but the loot of Mumbaikars", an angry post by Varsha Gaikwad | "हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

Varsha Gaikwad On dharavi redevelopment project adani : 'मुंबईचे भविष्य हे विक्रीसाठी नाही. आम्ही मोदानी लूटविरुद्ध लढू आणि जिंकू', असा संताप व्यक्त मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. धारावीतील अपात्र असलेल्या लोकांसाठी घरे उभारण्यासाठी मिठागराची २५६ एकर जमीन देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सरकारवर टीका केली. 

वर्षा गायकवाड यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी मिठागराच्या जमिनीवर बांधकाम केल्यास मुंबईला पुराचा धोका निर्माण होण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

वर्षा गायकवाड यांचे म्हणणे काय?

"मोदानी अँड कंपनीला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे", अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली. 

वर्षा गायकवाड यांनी अदानींच्या प्रकल्पावरून मोदींवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, "धारावीकरांचा, मुंबईकरांचा आणि पर्यावरणवादी यांचा प्रखर विरोध असताना, या मोदानी सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागरांच्या जमिनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहेत."

धारावीकरांना धारावीतच घरे द्या -गायकवाड

"आणि कारण काय? 'अपात्र' धारावीकरांसाठी घरे! आम्ही आधीच स्पष्ट केले आहे की, आम्हाला पात्र-अपात्र मान्य नाही. प्रत्येक धारावीकराने ही धारावी आपल्या रक्त आणि घामाने उभी केली आहे, त्यामुळे पात्र-अपात्रचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व धारावीकरांना धारावीमध्येच घरे मिळाली पाहिजेत", अशी मागणी त्यांनी केली आहे.  

"आधी हिरवळ आणि सार्वजनिक मोक्याच्या जागा मोदानीच्या हाती सोपवण्याच्या विरुद्ध रहिवाशांनी केलेल्या विरोधानंतर, आता पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या मिठागर जमिनी त्यांच्या हाती सोपवल्या जात आहेत", असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

"हे पर्यावरण संरक्षण कायद्याच्या विरोधात"
 
"मुंबईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठागरे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही मिठागरे दर पावसाळ्यात कोट्यवधी लीटर पाणी आपल्या पोटात साठवतात. मुंबईकरांना पुराचा फटका बसण्यापासून वाचवतात. तेव्हा मिठागरांच्या जमिनीवर भराव घालून तिथे इमारती उभारल्या, तर शहराला भयंकर पुराचा धोका अधिक संभवतो. पर्यावरणदृष्ट्या, खारफुटी जमिनींवर सरसकट बांधकाम परवानगी देण्याचे भयंकर परिणाम होणार आणि असे करणे पर्यावरण संरक्षण कायद्याच्याही विरोधात आहे", असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.  

"धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव घेऊन हे केवळ प्रचंड प्रमाणात भूमी बळकावण्याचेच कारस्थान आहे. हे विकास नव्हे तर, मुंबईकरांची लूट आहे. मुंबईचे भविष्य हे विक्रीसाठी नाही. आम्ही मोदानी लूटविरुद्ध लढू आणि जिंकू", असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला. 

Web Title: "This is not development of mumbai, but the loot of Mumbaikars", an angry post by Varsha Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.