"हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 09:05 AM2023-11-19T09:05:26+5:302023-11-19T09:49:45+5:30

देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

"This is the Modi-Shah Election Commission", a target from Samana Rokthok | "हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा 

"हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग", सामना रोखठोकमधून निशाणा 

लोकसभा निवडणुकीच्या आधी देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहे. या पाच राज्यांमधील निवडणुकांचा निकाल लोकसभेचं चित्र स्पष्ट करणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीत प्रचारासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून हा तर मोदी-शहा निवडणूक आयोग अशा शब्दांत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

देशात निवडणूक आयोग हा आज मोदी-शहा निवडणूक आयोग बनला आहे. सर्व घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण सुरू आहे. त्यातून निवडणूक आयोगही सुटला नाही. पंतप्रधान बजरंग बलीच्या नावाने मते मागतात. अमित शहा मध्य प्रदेशातील मतदारांना मोफत अयोध्यावारीचे प्रलोभन दाखवतात. पुलामातील जवानांचे हौतात्म्य हा प्रचाराचा मुद्दा भाजपकडून होतो. हे गंभीर आहे, असे सामना रोखठोकमधून म्हटले आहे. तसेच, एक तर पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात उतरू नये व उतरले तर त्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या पक्षाने करावा. निवडणूक आयोगास त्यावर मूकदर्शक बनता येणार नाही. सरकारी खर्चाने होणारा धार्मिक प्रचार, हेट स्पीच हे प्रकार आजच्या निवडणूक आयोगास खुपत नाहीत हे आश्चर्यच म्हणायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी रोखठोकमधून केली आहे.

याचबरोबर, निवडणूक आयोगाकडून आता स्वतंत्र, निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षा का करावी?बजरंग बलीचा नारा देत भाजपास मतदान करा, असे देशाचे पंतप्रधान प्रचार सभेत सांगतात. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली तर तेथील जनतेस 'अयोध्यावारी'चा लाभ देऊ. तोही मोफत, असे देशाचे गृहमंत्री जाहीर करतात. देशाला निवडणूक आयोग आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो!,असा हल्लाबोल रोकठोकमधून करण्यात आला आहे. याशिवाय, काँग्रेसचे निवडणूक चिन्ह म्हणजे हाताचा पंजा. लखनौच्या एका मेळाव्यात मागे राहुल गांधी म्हणाले, 'काँग्रेसचे चिन्ह असलेल्या हातावर मला देव आणि संत असल्याचा भास होतो.' या विधानावर राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगात व कोर्टात भाजपने धाव घेतली होती. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री त्यांच्या शासकीय लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर दबाव पडत असल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

गर्व से कहो हम हिंदू है!
1987 सालची विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणूक ही हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे विरूद्ध शिवसेनेचे रमेश प्रभू असा तो सामना होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर लढवलेली ती पहिली निवडणूक होती. 'गर्व से कहो हम हिंदू है!' असा जोरदार नारा तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता. पराभूत प्रभाकर कुंटे यांनी नंतर मुंबई हायकोर्टात याचिका केली. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा प्रचार केल्याचे कोर्टाने मान्य केले व त्यांना सहा वर्षांसाठी मतदानासाठी वंचित केले. हिंदुत्वासाठी एखाद्या नेत्याने केलेला हा सर्वोच्च त्या होता. रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक, रमाकांत  मयेकर या शिवसेना आमदारांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमदारक्या गमवाव्या लागल्या होता. आज हिंदुत्वाची ठेकेदारी चालवणाऱ्या भाजपला हिंदुत्वासाठी असा त्याग व संघर्ष करावा लागला. निवडणूक आयोग व इतर घटनात्मक संस्थांना मानेज करून ते हिंदुत्वाच्या लढाया लढले. त्या लढाया लटूपुटूच्या होत्या, अशा शब्दांत सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे.

Web Title: "This is the Modi-Shah Election Commission", a target from Samana Rokthok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.