मळद सोसायटीत थोरात गटाचे वर्चस्व

By admin | Published: May 21, 2016 01:14 AM2016-05-21T01:14:23+5:302016-05-21T01:14:23+5:30

माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातसमर्थक गटाच्या भैरवनाथ सहकार पॅनलने वर्चस्व कायम राखून सर्वच्या सर्व १३ जागांवर बाजी मारली.

Thorate group dominates in molasses society | मळद सोसायटीत थोरात गटाचे वर्चस्व

मळद सोसायटीत थोरात गटाचे वर्चस्व

Next


कुरकुंभ : मळद (ता. दौंड) येथे झालेल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरातसमर्थक गटाच्या भैरवनाथ सहकार पॅनलने वर्चस्व कायम राखून सर्वच्या सर्व १३ जागांवर बाजी मारली. तर, विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांचे भैरवनाथ परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवला आहे.
मळद सोसायटीची निवडणूक लागल्याने सर्व तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते; मात्र याही वेळेस कुल गटाला सोसायटीत अपयश स्वीकारावे लागले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीदरम्यान विजयी गटाचे नेतृत्व दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य बबन रणवरे,गजानन दुधे,दत्तात्रय शेलार,राहुाल भालेराव,सोपान शेलार,अरुण रणवरे,प्रदीप साळवे, महेश रणवरे मनोहर जाधव,रामभाऊ म्हेत्रे यांनी केले.
सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत असून पारदर्शी कारभारामुळे यश मिळाले असून यशाचे संपूर्ण श्रेय सोसायटीच्या मतदारांना जाते, असे विजयी पॅनलच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : दत्तात्रय शेलार, झुंबर गोलांडे, नामदेव दुधे, दिगंबर कुलथे, अंकुश म्हेत्रे, बाबा शेलार,
शंकर रणवरे, किसन शितोळे, शिवाजी आटोळे, सुनील दुधे, अशोक साळवे, नंदा निंबाळकर, विमल शेलार.

Web Title: Thorate group dominates in molasses society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.