स्त्रीशक्तीच्या जागरात नवजात बालिकेच्या गळ्याला नख

By admin | Published: October 6, 2016 10:50 PM2016-10-06T22:50:13+5:302016-10-06T22:50:13+5:30

नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौयार्ने परिसीमा गाठली. चार मुलींच्या पाठीवर जुळ्या मुलीच

Thoroughly to the baby's throat in the newborn in the field of manpower | स्त्रीशक्तीच्या जागरात नवजात बालिकेच्या गळ्याला नख

स्त्रीशक्तीच्या जागरात नवजात बालिकेच्या गळ्याला नख

Next

-  सुरेंद्र राऊत/ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि.06 - नवरात्रोत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात मात्र कौयार्ने परिसीमा गाठली. चार मुलींच्या पाठीवर जुळ्या मुलीच झाल्याने जन्मदात्यांनीच नवजात बालिकेच्या गळ््याला नख लावले. जगात पाऊल ठेवताच तिला यमसदनी धाडले. वंशाच्या दिव्याच्या हव्यासात घडलेल्या या कृत्याने शासकीय रुग्णालयाच्या भिंतीही नि:शब्द झाल्या.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उमरखेड तालुक्यातील चिल्ली येथील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. तिने सोमवारी पहाटे ६.१५ वाजता १५ मिनीटाच्या अंतरात जुळ्या मुलींना जन्म दिला. चार मुलींच्या पाठीवर दोन जुळ्या मुली झाल्याने कुटुंब खिन्न झाले. नवागताच्या जन्माचा कोणताही आनंद चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यातच पहिल्यांदा जन्मला आलेल्या मुलीचे वजन कमी होते. निपचित दिसत असल्याने तिला बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र अपेक्षा भंग झालेल्या पित्याने या कक्षात उपचारासाठी नेण्यास स्पष्ट नकार दिला. तसे लेखीही डॉक्टरांना दिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मुली जन्माला आल्याचा तणाव दिसत होता. अशा तणावातच रात्र झाली. तोपर्यंत वजनाने कमी असलेल्या मुलीची हालचाल सुरू झाली. त्यावेळी या मुलींजवळ बाळंतीण आणि आजी होती. तर पिता प्रसूती वाडार्बाहेर झोपला होता. मुलीची हालचाल बंद झाल्याचे लक्षात येताच आजीने वाडार्तील नर्सला सूचना दिली. नर्सने बालरोग विभागात जाण्याचा पुन्हा सल्ला दिला. तेव्हा पिता आणि आजी त्या मुलीला घेऊन बालरोग विभागात गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित केले.
यानंतर चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दुपारी प्राथमिक अहवाल आला. तिच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसून आले. चिमुकलीचा मृत्यू आजाराने नव्हे तर गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात अज्ञात व्यक्तीने चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तूर्तास या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र निश्चित केला नाही. जन्मदात्यांवरच पोलिसांचा संशय असून पाठोपाठ झालेल्या मुलीमुळेच हे कृत्य केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहे.

पाच मुलींच्या भविष्याचा प्रश्न
नवजात मुलीचा गळा आवळल्याने चील्ली येथील दाम्पत्य आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे. मात्र पोलींसासमोर गुन्हा दाखल करताना वेगळाच पेच निर्माण झाला आहे. नेमका गळा कुणी आवळला हे निश्चित नाही. मात्र जन्मदात्यापैकी कुणालाही आरोपी केले तरी इतर पाच मुलींच्या भविष्याचे पुढे काय, असा प्रश्न पुढे येत आहे. कर्तव्य की माणुसकी अशा पेचात नेमका कुणावर गुन्हा दाखल करावा हा प्रश्न शहर पोलिसांना सतावत आहे. या प्रकरणात सदर मुलीच्या पित्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Thoroughly to the baby's throat in the newborn in the field of manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.