"त्या" कर्मचाऱ्यांना लुटल्याबद्दल कारावास,10 जणांसह 2 पोलिसांचा समावेश

By admin | Published: May 12, 2017 03:09 AM2017-05-12T03:09:52+5:302017-05-12T03:10:21+5:30

कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लुटून त्यांच्याकडील सहा कोटी किमतीचे हिरे व सोने लुटल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने गुरुवारी दहा जणांना

"Those" employees are imprisoned for looting, including 10 people, including two policemen | "त्या" कर्मचाऱ्यांना लुटल्याबद्दल कारावास,10 जणांसह 2 पोलिसांचा समावेश

"त्या" कर्मचाऱ्यांना लुटल्याबद्दल कारावास,10 जणांसह 2 पोलिसांचा समावेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लुटून त्यांच्याकडील सहा कोटी किमतीचे हिरे व सोने लुटल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने गुरुवारी दहा जणांना १० वर्षे सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १४ नोव्हेंबर २०१३ रोजी साई एअर पार्सल सर्व्हिसचे व्यवस्थापक अमित सैनी, वाहक खुशबुद्दीन शेखसह एक कर्मचारी डोमेस्टिक एअरपोर्टकडे निघाले. त्यांच्याजवळ ६६ पाकिटांत हिरे, सोने आणि चांदीच्या दागिने होते ही पाकिटे दिल्ली, जयपूर आणि चेन्नईत पाठवायची होती.
मारुती स्वीफ्टने वांद्रे-वरळी सी लिंक क्रॉस केल्यावर एका गाडीने त्यांना थांबण्याचा इशारा केला. शेखने गाडी थांबवली. समोरच्या गाडीतून पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या दोन व्यक्ती उतरल्या. त्यांनी शेखला गाडी एवढ्या वेगाने का चालवतोस? असा प्रश्न केला. त्यानंतर शेखचा व दोघांचा मोबाईल घेत गाडी पोलीसांत नेण्यास सांगितले. दोघे पोलीस त्यांच्या गाडीत बसले. थोड्यावेळानी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हातातली पाकिटे खेचून बगल दिली. त्यामुळे कुरिअरच्या कर्मचाऱ्यांनी पोलीसांत तक्रार केली.
गुन्ह्यासाठी त्यांनी नवी मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलीस उपायुक्तांची कार वापरली. डेंगळे त्यावेळी मरोळच्या प्रशिक्षण विभागात होता. नव्याने भरती करण्यात आलेल्या हवालदारांना प्रशिक्षण तो देत असे.
एकूण ३० साक्षीदारांच्या साक्षी तपासून न्या. पी. एस. तरारे यांनी सर्व आरोपींना १० वर्षांच्या सक्त कारावास तसेच प्रत्येकाला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
हवालदार, उपनिरीक्षकाचा सहभाग-
दोनच दिवस२ांत पोलिसांना हा गुन्ह्यात ड्रायव्हर शेख सहभागी असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक आणि हवालदाराही सहभागी असल्याचे शेखने पोलिसांना सांगितले. तपासादरम्यान पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात हवालदार म्हणून काम करणाऱ्या मयुर देंगाडे,पोलीस उपनिरीक्षक महादेव डेंगळे यांना ताब्यात घेतले.

Web Title: "Those" employees are imprisoned for looting, including 10 people, including two policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.