पोलिसांवर हल्ले करणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे - उद्धव ठाकरे

By admin | Published: September 7, 2016 11:53 AM2016-09-07T11:53:51+5:302016-09-07T13:32:55+5:30

पोलिसांवर हात उचलणा-यांना, त्यांच्यावर हल्ला करणा-यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Those who attacked the police should be punished - Uddhav Thackeray | पोलिसांवर हल्ले करणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे - उद्धव ठाकरे

पोलिसांवर हल्ले करणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे - उद्धव ठाकरे

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - राज्यातील पोलिसांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत असून पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर कल्याणमध्ये पुन्हा खाकी वर्दीवर हात उचलण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ' ज्यांच्यावर इतरांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्यावरच हल्ले होतान दिसत असून कायद्याच्या रक्षमकर्त्यांनाच आता सुरक्षा देण्याची' वेळ ओढावली आहे.  याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिस कुटुंबियांसह बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली. 
' सर्वांना कायद्याचा धाक असला पाहिजे. पोलिसांवर हात उचलणा-यांनार, हल्ले करणा-यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे' असे उद्धव यांनी बैठकीनंतर सांगितले. ' प्रत्येक नागरिकाने पोलिसांना आपल्या कुटुंबातील एक व्यक्तीच मानायला हवे. गेल्या काही दिवसांत पोलिसांवरील हल्ल्यात वाढ झाली असून त्यांच्या सुरक्षेबाबत आम्ही आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पोलिसांची सुरक्षितता, कायद्याची अंमलबजावणी, हल्लेखोरांना कठोर शिक्षा, अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. माझ्यापेक्षा, पोलिस पत्नीच मुख्यमंत्र्यांशी बोलल्या, त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या' असेही उद्धव यांनी सांगितले. 
पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यानंतर काही दिवसानंतरच एका पोलीस कॉन्स्टेबलच्या अंगावर तरुणाने बाईक घातल्याची घटना समोर आली होती. एका महिला कॉन्स्टेबलला महिलेनेच केलेली मारहाण आणि लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांने पोलिसाला केलेली अडवणूक या अशा घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. 

गृहखात्याचा कारभार स्वतंत्र असावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले आहेत पण त्यांचा व्याप खूप वाढला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असे माझे स्पष्ट मत आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या गृहमंत्रीपदाबाबत सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्याचा व्याप खूप वाढल्याने गृहमंत्रीपदाचा भार दुस-या कोणाकडे तरी सोपवावा, अशी मागणी त्यांनी केली. 

(जखमी वाहतूक पोलीस विलास शिंदे यांचा मृत्यू) 
(VIDEO: कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न)
(मद्यधुंद कार चालकाने पोलीसाला फरफटत नेले)
(लालबागमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण)
(आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच...)
 
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

- गेल्या काही दिवसांत पोलिसांवर होणारे हल्ले वाढलेत

- समाजात पोलीसच असुरक्षित असतील तर आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत याचा विचार केला पाहिजे

- पोलीसांना आपण हातात हातकड्या घालून ड्युटीवर पाठवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- पोलिसांच्या कुटुंबियांनी माझी भेट घेतल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची विनंती केली होती त्याप्रमाणे मुख्यमंत्री आज आम्हाला भेटले. 
- पोलीस कुटुंबियांनी आपल्या समस्या स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. 
- पोलिसांच्या केसाला धक्का लागता काम नये. पोलीसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे
- आम्ही विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. 
- पोलिसांच्या कुटुंबियांना समाविष्ट करून एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये पोलीस कुटुंबीय, सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असणार आहेत. 
- या समितीच्या माध्यमातून पोलीसांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील मार्ग काढला जाईल
- पोलिसांच्या घरांचा प्रश्न,  अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांचा प्रश्न तसेच पोलीसांबाबत एखादी दुर्घटना घडली तर तात्काळ जवळच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार मिळावेत याविषयी चर्चा झाली. 
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले आहेत पण त्यांचा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असे माझे स्पष्ट मत आहे. 
- सरकार माझं आहे असा संदेश पोलिसांमध्ये गेला पाहिजे.
- कल्याण डोंबिवली परिसरात पोलीस अधिकाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संबंधितांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कडक कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कारवाईचे आश्वासन दिले आहे. 

Web Title: Those who attacked the police should be punished - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.