ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 06:19 PM2023-02-02T18:19:15+5:302023-02-02T18:20:15+5:30

मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते असं अंबादास दानवेंनी म्हटलं.

Those who can should use the iPhone; Thackeray group leader's Ambadas Danve advice to office bearers | ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

ज्यांना शक्य त्यांनी आयफोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

googlenewsNext

मुंबई - मोबाईलमध्ये सर्वात महागडा फोन म्हटलं की, डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे आयफोन, आयफोनची किंमत लाखोंच्या घरात असते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हाच आयफोन ज्यांना शक्य आहे त्यांनी वापरावा असा सल्ला ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या सूचना पक्षाकडून आल्या नाही. परंतु जबाबदार लोकांनी जबाबदारीनं बोललं आणि वागलं पाहिजे. चार लोकांत बोलताना काही शब्द निघतात. मग त्याचा बाऊ केला जातो त्यामुळे सुरक्षितता म्हणून काही बंधनं पाळली पाहिजेत असं दानवेंनी म्हटलं. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मागच्या काळात सरकारनं रश्मी शुल्का यांना फोन टॅपिंग करायला सांगितले होते. सरकारसुद्धा मुद्दामहून जाणीवपूर्वक राजकारण करण्यासाठी मुख्य नेत्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाते म्हणून सुरक्षितता घेतली पाहिजे. लक्ष असल्याने घाबरण्याची गरज नाही मात्र तरीही मी माझ्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरावा असा सल्ला देत असतो. 

तसेच मागच्या काळात जे घडले आहे तसं आत्ताचं सरकार कुठल्याही स्तरावर जाऊ शकते. लहान लहान माणसांना, शिवसैनिकांना त्रास दिला जातोय. अशा परिस्थितीत सरकारवर विश्वास असण्याचा प्रश्नच नाही. आमचा या सरकारवर बिल्कुल विश्वास नाही. त्यामुळे सरकार काही गोष्टींचा गैरवापर करू शकते म्हणून आपण आपली खबरदारी घ्यावी अशा सूचना सातत्याने मी सगळ्यांना देत असतो असं अंबादास दानवेंनी म्हटलं. 

दरम्यान, सगळ्यांनी आयफोन घ्यावा असं म्हटलं नाही. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आयफोन वापरावा असं म्हटलं आहे. त्यामुळे फारकाही वार्डात काम करणारे, गावात काम करणारे, बऱ्याच जणांकडे फोनही नसतात. परंतु जे प्रमुख नेते जबाबदार पदावर असताना त्यांनी सुरक्षितता घेतली पाहिजे असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले. 

कार्यकर्ते श्रीमंत झाले असतील
आयफोनची किंमत मोठी आहे. जो संदेश गेला तो राज्यातील जनतेसमोर चुकीचा जाऊ शकतो. आयफोन कुणाला परवडत नाही, आता कार्यकर्ते तेवढे श्रीमंत झाले असतील. मी शिवसेनेत आलो तेव्हा वडापाव खाऊन प्रचार करणारे शिवसैनिक होते. कुठलीही अपेक्षा न करता वडापाव खाऊन शिवसैनिकांनी काम केलंय त्यामुळे आयफोनवर बोलू शकत नाही असा टोला मंत्री दिपक केसरकरांनी अंबादास दानवेंना लगावला आहे. 
 

Web Title: Those who can should use the iPhone; Thackeray group leader's Ambadas Danve advice to office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.