ज्यांच्या विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला - धनंजय मुंडे
By admin | Published: August 3, 2016 08:41 PM2016-08-03T20:41:00+5:302016-08-03T21:09:05+5:30
ज्या सरकार विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला, ही लोकशाही आहे असं मनोगत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - ज्या सरकार विरोधात बोललो त्यांनीच सत्कार केला, ही लोकशाही आहे असं मनोगत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केलं आहे. धनंजय मुंडे यांना उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधान परिषद सदस्य) पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
अशा पुरस्काराने काम करायला बळ मिळते, आमच्या वक्तव्याने कोणताही घाव उमटणार नाही असे आज सांगतो असंही धनंजय मुंडे यावेळी बोलले आहेत.
प्रकाश आबिटकर यांनाही उत्कृष्ट अभ्यासू वक्ता (विधानसभा सदस्य) पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या देशात सगळ्या माणसांचे कौतुक होते. कलाकार, पत्रकार, सगळ्यांचे कौतुक, पण राजकारणाच्या कौतुक नाही. त्यामुळे पुढच्या काळात चांगले लोक यावेत म्हणून ग्रामपंचायती पासून पुसरस्कार द्यावते, सरकारनेपण असे पुरस्कार द्यावेत अशी अपेक्षा प्रकाश आबिटकर यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रकाश आबिटकर - उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार (विधानसभा सदस्य)