आणखी १५० तरुणांना गंडा

By Admin | Published: November 2, 2016 05:41 AM2016-11-02T05:41:03+5:302016-11-02T05:41:03+5:30

उच्चशिक्षितांना लुबाडणाऱ्या एका टोळीने अंधेरीमध्ये यापूर्वीदेखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले.

Thousands of 150 young people | आणखी १५० तरुणांना गंडा

आणखी १५० तरुणांना गंडा

googlenewsNext


मुंबई : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून अनेक उच्चशिक्षितांना लुबाडणाऱ्या एका टोळीने अंधेरीमध्ये यापूर्वीदेखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी अंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
दिव्येश पटेल (४१), शाहीन शेख (२७), रमेश भंडारी उर्फ राम अगरवाल (३०), सोहन शर्मा (२६) आणि सलाउद्दीन साळे (३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीने एक्सल इंटरनॅशनल नावाने अंधेरीत बनावट कंपनी स्थापन करून
शेकडो तरुणांची फसवणूक केली. अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याने सहा महिन्यांपूर्वीदेखील अशाच प्रकारे अलमायटी मायग्रेशन सर्व्हिस या नावाने अंधेरीतच एक आॅफिस थाटले होते. या टोळीने दीडशे तरुणांची फसवणूक केली होती, असे गायकवाड यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of 150 young people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.